30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरदेश दुनियाइस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप

इस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप

इस्रायलवरील हल्ला

Google News Follow

हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. हमासने ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागली असून आता या हल्ल्यासंदर्भातील काही व्हीडिओ समोर येऊ लागले आहेत. त्यात इस्रायलच्या एका महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी पकडून गाडीत कोंबले आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देत तिला रस्त्यावरून हात बांधून नेतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले.

हे ही वाचा:

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या अनेक नागरिकांना आणि सुरक्षा दलाच्या लोकांना पकडले आहे. अशाच एका महिलेला तिचे हात मागे बांधून हमासचे अतिरेकी नेतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. नंतर तिला जीपमध्ये कोंबण्यात आले. अल्ला हू अकबरच्या घोषणा हे अतिरेकी देत होते. नंतर आणखी एका व्हीडिओत मृत्यू पावलेल्या एका इस्रायली महिलेचा मृतदेह खुल्या गाडीतून नेताना हेच अतिरेकी दिसत आहेत. त्या मृतदेहावर कपडे नाहीत त्यामुळे जगभरात संताप व्यक्त होत आहे. आणखी एका व्हीडिओत इस्रायलची एक वृद्ध महिलेचे अपहरण करण्यात आल्याचे दिसते आहे. ती ग़ॉल्फ कार्ट चालवत असताना गाझा पट्टीत तिचे अपहरण करण्यात आले. हमासच्या अतिरेक्यांनीच हे व्हीडिओ काढले आहेत.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा