29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरदेश दुनियालतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श...

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

Google News Follow

Related

प्रख्यात गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगीतसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींनी आपल्या या ९२ वर्षाच्या आयुष्यात अनेक स्वप्न पाहिली, अनेक स्वप्न पूर्णही केली. गाण्यांचे रेकॉर्डिंग करून आल्यावर त्यांना एक स्वप्न पडत असे, त्याविषयी त्यांनाही कुतुहल वाटत असे. लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबियांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या जयश्री देसाई यांनी लतादीदींच्या त्या स्वप्नाविषयी आणि अनेक संकल्पांविषयी सांगितले.

जयश्री देसाई म्हणाल्या की, कितीही म्हटलं तरी  मृत्यू हा अटळ असतो. दीदींना शारीरिक यातनाही खूप होत्या, पण शेवटपर्यंत त्या काही ना काही करत होत्या. ऍडमिट व्हायच्या आधी ९२ व्या वर्षीही त्यांचे सगळे प्रोजेक्ट स्वतः करण्याची त्यांच्यात ताकद होती. दीनानाथ मंगेशकर विद्यापीठ सुरू करण्याचे कार्य त्यांनी हातात घेतलं होत. वृद्धांसाठी त्यांना खूप ममत्व होत. त्यामुळे वृद्ध कलावंतांना त्या खूप महत्त्व देत असत. त्यांच्यासाठी व्यक्तिगत पातळीवर तर त्या काम करत होत्या. तरीही अनेक वृद्ध कलावंतांची उपेक्षा झाली अशी त्यांना खंत वाटत होती. वृद्ध कलावंतासाठी एक वृध्दाश्रम असावा, असा एक प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता.

जयश्री देसाई यांनी लतादीदींना पडणाऱ्या एका स्वप्नाविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, लतादीदींना एक स्वप्न सुरुवातीपासून पडायचं. गाणी रेकॉर्ड करून आल्यानंतर जेव्हा त्या झोपायच्या, त्या स्वप्नात ज्या मंदिरात त्या जात असत तेथून त्या बाहेर पडल्या की, मागच्या बाजूला एक समुद्र होता. त्या तिथे गेल्या की त्या लाटा त्यांच्या पायापर्यंत यायच्या आणि स्वप्न तिथेच संपायचे. हा एक ईश्वरी आशीर्वाद आहे असं त्यांना वाटायचं. त्यांची शंकरावर खूप भक्ती होती. विवेकानंद हे त्यांचे दैवत होतं. विवेकानंदांमुळे त्यांचं आयुष्य बदलेल असं त्यांचं म्हणणं होतं.

‘मोगरा फुलला’ या गाण्यावर जसे त्यांनी विवेचन केलं तसं त्यांनी मिराबाईंच्या गाण्यावरही करावं. तेव्हा त्या म्हणाल्या मला ती पुन्हा भाषा शिकून मीराबाईंचे प्रत्येक गाणे अभ्यासायचे आहे. मेवाती भाषा शिकून विवेचन करायची त्यांची इच्छा होती.  प्रत्येक गाणं अभ्यासायचं आणि मग ते करायचं अस त्यांच्या मनात होते.

हे ही वाचा:

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

‘लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या’

‘लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे’

‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

 

जयश्री देसाई म्हणाल्या की, वाढदिवसाच्या आधी जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी त्यांना विचारलं ९२ यावर्षीही जिगर येते कुठून? त्या मृत्यूशी झुंज देऊन आल्या होत्या. त्यांची पथ्य सुरू होती. अशा परिस्थितीत हिम्मत येते कशी, अशा परिस्थितीत अनेक लोक डिप्रेशन मध्ये जातात, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आयुष्य म्हटलं की, या सर्व गोष्टी येतातच  मात्र त्या आयुष्याला पुरून उरत नाहीत. आपण फक्त काळजी घ्यायची आपली आणि आपल्या परिवाराची आणि आपलं काम चालू ठेवायचं.

त्यांनी कधी वयाचा विचार केला नाही. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्या गायल्या आहेत. त्या अत्यंत साध्या होत्या. इतर सेलिब्रेटींसारख्या त्या नव्हत्या. आपण त्यांच्या घरी गेलो तरी आई जसं माहेरी आलेल्या मुलीला वागणूक देते, तशा त्या अगत्याने बोलायच्या, जयश्री देसाई सांगतात.

परफ्युमबद्दल त्यांना होतं आकर्षण

त्या एक चमत्कारच होत्या. परफ्युम्स मधले त्यांना उत्तम कळायचे. म्हणून त्यांनी त्यांच्या नावाचं ब्रँड काढला होता. ज्वेलरी डिझाईन मधले त्यांना खूप कळायचे आणि हे पण काही तर कुठे जाऊन शिकून आल्या नव्हत्या.  त्यांची त्यांना दृष्टी होती. तसेच त्यांना चित्रकलाही खूप आवडत असे. मौने नावाचा फ्रेंच चित्रकार हा त्यांचा आवडता चित्रकार होता. जेव्हा त्या कोल्हापूरला होत्या, तेव्हा त्या चित्रकाराची पोस्ट कार्ड घेऊन त्यात ते चित्र तसंच्या तसं काढण्याचा प्रयत्न करायच्या. त्या तीन वेळा त्या फ्रान्सला जाऊन त्या चित्रकाराचे घर आणि त्या चित्रातला परिसर पाहून आल्या होत्या. त्यांनी ध्यास घेतला होता.

त्यांची जिद्द

त्यांची एकच जिद्द होती त्यांच्या माईला त्यांचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं. त्यांनी फक्त माईंना काय हवं भावंडांना काय हवं हेच पाहिलं. वैयक्तिक आयुष्यात जास्त लक्ष दिले नाही. माझ्या भावांडांना सुखात ठेवायचं होतं हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी त्या झटत राहिल्या. एका चहाच्या कपावर सहा आठ गाणी त्या रेकॉर्ड करायचा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा