29.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरदेश दुनियाइस्रायली हल्ल्यात लेबनॉनमधील महिला पत्रकार ठार

इस्रायली हल्ल्यात लेबनॉनमधील महिला पत्रकार ठार

अमल खलील या अल-अखबार दैनिकासाठी करत होत्या काम

Google News Follow

इस्रायल- हिजबुल्लाह युद्धावर वार्तांकन करत असताना दक्षिण लेबनॉनमधील एका घरात आश्रय घेतलेल्या एका लेबनीज पत्रकाराचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आले आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृतदेह ढिगाऱ्याखालून अनेक तासांनंतर बाहेर काढण्यात आला. अल-अखबार दैनिकाने म्हटले आहे की, त्यांचे पत्रकार अमल खलील यांची दक्षिणेकडील अल-तिरी गावात हत्या करण्यात आली.

इराणमधील अमेरिका- इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मार्चच्या सुरुवातीला लेबनॉनमध्ये इस्रायल आणि लेबनीज हिजबुल्ला दहशतवादी गट यांच्यात पुन्हा सुरू झालेल्या संघर्षाचे खलील या वार्तांकन करत होत्या. दुसऱ्या एका सहकाऱ्यासोबत त्यांनी अल-तिरी येथील घरात आश्रय घेतला. लेबनीज आरोग्य मंत्रालयाने सांगितले की पहिल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले. त्यानंतर इस्रायलने अल-तिरी येथील त्या घरावर दुसरा हल्ला केला, जिथे खलील आणि तिची सहकारी झैनब फराज यांनी आश्रय घेतला होता.

सुरुवातीला, बचाव पथक गंभीर जखमी झालेल्या फराजपर्यंत पोहोचू शकले आणि पहिल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढू शकले. परंतु इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे त्यांना खलीलपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न थांबवावे लागले, असे मंत्रालयाने सांगितले. लेबनीज सैन्य, नागरी संरक्षण दल आणि लेबनीज रेड क्रॉस घटनास्थळी पोहोचेपर्यंत खलील कित्येक तास ढिगाऱ्याखाली अडकून राहिल्या होत्या. हल्ल्यानंतर किमान सहा तासांनी, मध्यरात्रीच्या थोड्या वेळापूर्वी खलील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. “पत्रकारांची हत्या हा एक गुन्हा असून आंतरराष्ट्रीय आणि मानवतावादी कायद्याचे हे घोर उल्लंघन आहे,” असे लेबनॉनचे माहिती मंत्री पॉल मोरकोस म्हणाले.

हे ही वाचा:

नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा राजीनामा

“दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात आम्ही भारतासोबत”

नेपाळमध्ये बालेन शाह सरकार विरुद्ध जनता पुन्हा रस्त्यावर

कर्नाटकमधील होमस्टेमध्ये अमेरिकन पर्यटकावर बलात्कार

दक्षिण लेबनॉनची रहिवासी असलेल्या खलील, २००६ पासून अल-अखबारसाठी त्या भागाचे वार्तांकन करत होत्या. तिचे नवीनतम वार्तांकन, लेबनॉनमध्ये ज्या गावांमध्ये इस्रायली सैन्य तैनात आहे, तेथील लेबनॉनच्या नागरिकांच्या घरांच्या इस्रायली विध्वंसाविषयी होते. तिच्या मृत्यूमुळे या वर्षी आतापर्यंत लेबनॉनमध्ये ठार झालेल्या पत्रकारांची संख्या नऊ झाली आहे. २ मार्च रोजी इस्रायल-हिजबुल्लाह युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान २,३०० लोक ठार झाले आहेत आणि १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा