32 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरदेश दुनियादिल्लीत लव्हजिहादचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला...

दिल्लीत लव्हजिहादचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला…

Google News Follow

Related

मोबाईलचा वापर कसा करायला हवा हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे. अनेकदा पालक मुलांच्या सोयीसाठी त्यांना हाती मोबाईल देतात. परंतु त्याचा योग्य वापर न केल्यामुळे अनेकदा फसगतही होते. शिवाय नको त्या घटनांना आमंत्रणही दिले जाते.

शिक्षणाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीची सोशल मीडीयावर ओळख झाली. सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिल्लीच्या या तरुणांनी या अल्पवयीन मुलीला चक्क पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न मात्र फसला आणि ही मुलगी पोलिसांच्या हाती सापडली.

पुलगाव येथील ही अल्पवयीन मुलगी आहे. वडिलांनी शिक्षण नीट घेता यावे, या हेतूने मुलीच्या हाती मोबाईल दिला. पण घडले मात्र भलतेच. सदर मुलीने सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिल्ली येथील दोन तरूणांशी मैत्री केली. या तरुणांचे नाव मोहम्मद चांद कुरेशी आणि मोहम्मद इस्लाम कुरेशी असे आहे. त्यानंतर या मुलीने व्हॅटसअपच्या माध्यमातून या मुलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

जवळपास तीन महिने हा असा प्रकार यांच्यामध्ये सुरु होता. हे दोन्ही तरूण दिल्लीमधून तिच्या गावी पुलगाव येथे दाखल झाले. २०सप्टेंबर रोजी ते पुलगावमध्ये आले. सदर मुलांनी एका ठिकाणी खोली भाड्याने घेतली. या मुलांनी २१ सप्टेंबरला या अल्पवयीन मुलीला घेऊन पळून जाण्याचा प्लान बनवला होता. परंतु हा प्लान काही यशस्वी झाला नाही. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच यांना नागपूर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

चार वर्षांपूर्वी अपघात झालेल्याच्या कुटुंबियांना मिळाले ८७ लाख

घरकाम करता करता तिने ‘साफ’ केली अनेक घरे

इंजीनिअरना शिक्षा ठोठावली खरी; पण निर्णय राखूनही ठेवला

लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय

सदर प्रकरणाचा छडा हा पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने लावला. त्यामुळेच वेळीच या प्रकरणाचा छडा लागला आणि अल्पवयीन मुलगी वाचली. तसेच या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा