30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!

ग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!

बलात्कार आणि जबरदस्तीने गोमांस खायला दिले, इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका लव्ह जिहाद प्रकरणात, साबीर खान नावाच्या विवाहित व्यक्तीवर एका हिंदू मुलीला त्याच्या लग्नानंतर त्याच्याशी मैत्री करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा आणि तिला तीन वर्षांहून अधिक काळ ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. जेव्हा पीडितेने तिच्या घरी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि ‘सुसाईड नोट’ लिहून तिच्या भावाला आणि वडिलांना अडकवण्याची धमकी दिली. कैदेत असताना आरोपी साबीर खान याने तिचा शारीरिक आणि लैंगिक छळ केला आणि अनैसर्गिक कृत्य केले. त्याने तिला गोमांस खाण्यास भाग पाडले आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, असाही आरोप आहे.

२७ वर्षीय पीडित तरुणी तारागंज, ग्वाल्हेर येथील रहिवासी असून तिने शुक्रवारी (२६ एप्रिल २०२४) बहोदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचे वडील तंबूशी संबंधित व्यवसायातून उदरनिर्वाह करतात. आरोपी साबीर खान उर्फ छोटे खान हा तिच्या घराजवळ राहत असून तो विवाहित आहे.साबीर खानने ऑक्टोबर २०२१मध्ये पहिल्यांदा पीडितेशी संपर्क साधला होता. कालांतराने, त्याने तिच्याशी मैत्री केली आणि ते एकमेकांशी संवाद साधू लागले. तोपर्यंत तो विवाहित नव्हता.

लग्नानंतर पीडितेने त्याच्यासोबतची मैत्री संपवली. मात्र, आरोपी तिच्या जवळ येत राहिला आणि तिला त्रास देऊ लागला.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी साबीर खानने तिला सांगितले की, तिने त्याचे ऐकले नाही तर तो आत्महत्या करेल आणि सुसाइड नोट लिहून तो तिच्या वडिलांचे आणि भावांचे नाव लिहून त्यांना यात गोवेल. त्यामुळे ती घाबरली आणि ती त्याच्याशी बोलू लागली. एक दिवस त्याने पीडितेला भेटायला बोलावले. त्यानंतर, जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याने तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. सुरक्षिततेच्या भीतीने तरुणीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

हे ही वाचा:

ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

ढाल गादीची, चिंता मोदींची!

भाजपाकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केला

फिर्यादीनुसार, खानने पीडितेला बळजबरीने बहोदापूर येथील रामाजी कल्व्हर्ट (पुलिया) येथे नेले आणि तेथे त्याने तिचा लैंगिक छळ केला. त्याने मुलीला आपल्या घरात ओलिस ठेवले आणि आत्महत्येची धमकी देऊन तिला तिच्या घरी जाण्यापासून रोखले. तो दररोज तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असे आणि तिने नकार दिल्यावर तो तिच्यावर शारीरिक अत्याचार करत असे. त्याने तिला जेवणापासूनही वंचित ठेवले.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, साबीरने तिच्यासोबत सर्व मर्यादा ओलांडल्या आणि तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक कृत्येही केली. तिने सांगितले की, साबीर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत असे. तो म्हणायचा, “जर तू माझ्यासोबत राहत असशील तर तुला मुसलमान व्हावे लागेल. शिवाय, तिला गोमांस खाण्यास भाग पाडले. तिने तक्रारीत म्हटले आहे की, साबीरचे वडील युसूफ खान आणि भाऊ समीर खान हेदेखील तिला मारहाण करायचे.
साबीरची पत्नी आणि आईनेही तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु घरमालकाने वेळीच येऊन तिचा जीव वाचवला. आरोपी निघून गेल्यावर ती कशीतरी पळून घरी पोहोचण्यात यशस्वी झाली.

त्यानंतर हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी बहोदापूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी बहोदापूर पोलीस ठाण्यात साबीर खान, त्याचे वडील युसूफ खान आणि त्याचा भाऊ समीर खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांनी साबीर खानवर बलात्कार, मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१ आणि प्राणघातक हल्ला यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत.

तारागंज येथील एका मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी तिला धर्मांतर करण्याची धमकी दिली, तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. एफआयआर दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे, असे बहोदापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र सिंह तोमरख यांनी सांगितले. याप्रकरणी कठोर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा