31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरविशेषसीबीआयच्या संदेशखालीतील छापेमारीवरून बंगालमध्ये नवीन राजकीय वाद!

सीबीआयच्या संदेशखालीतील छापेमारीवरून बंगालमध्ये नवीन राजकीय वाद!

तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Google News Follow

Related

संदेशखालीत छापेमारी करून शस्त्रास्त्रे जप्त केल्याचा बनाव सीबीआयने रचल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षांची गळचेपी होत असल्याची तक्रार तृणमूलने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील अग्रहाटी गावात दोन ठिकाणी छापे टाकून अनेक शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. शनिवारीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आगरहाटीला भेट दिली आणि ज्याच्या घरातून शस्त्रे जप्त केली, तो अबू तालेब कुठे आहे, त्याबद्दल गावकऱ्यांची चौकशी केली. तालेब फरार झाल्याची नोंद आहे.
बंगाल सरकारने शहाजहान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध संदेशखाली येथील खंडणी, जमीन हडप आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देणाऱ्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील कुल्टी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना बॅनर्जी यांनी छाप्यांवरून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “तो (शस्त्रे आणि दारूगोळा) कोठून जप्त करण्यात आला हे कोणालाही माहिती नाही. कदाचित, त्यांनी (केंद्रीय एजन्सी) ते त्यांच्या स्वत:च्या गाडीमधून आणले आणि परत मिळवलेल्या वस्तू म्हणून सादर केले. ते तिथे (घरात) सापडल्याचे दाखविणारा कोणताही पुरावा नाही,’ असा दावा बॅनर्जी यांनी केला.

हे ही वाचा:

ग्वाल्हेरमध्ये लव्ह जिहाद: विवाहित साबीरकडून हिंदू मुलीचे अपहरण!

ज्यू अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा अमेरिकेतील पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनाशी संबंध!

ढाल गादीची, चिंता मोदींची!

भाजपाकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात

तृणमूलने या प्रकरणी बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. ‘सीबीआयने संदेशखाली येथे एका रिकाम्या जागी मुद्दाम छापा टाकला होता. भाजपने सीबीआय आणि एनएसजीशी संगनमत करून शस्त्रे व दारूगोळा या जागी पेरण्याचा डाव आखला,’ असे तृणमूलने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या आरोपांवरून भाजपने तृणमूलला फटकारले आहे. ‘शेख शहाजहान सारख्या गुन्हेगाराकडे पोलिस रिव्हॉल्व्हर कसे सापडले? ते राज्याच्या शस्त्रागारातून चोरीला गेले होते का? याबाबत कधी कळवले होते का? बंगालच्या पोलिस महासंचालकांची कोठडीत चौकशी केल्यास त्यावर प्रकाश पडू शकतो.

किंवा त्याहून वाईट म्हणजे, ममता बॅनर्जी गृहमंत्री असताना पश्चिम बंगालचे पोलिस आता देशात अवैध विदेशी शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या एका वाढत्या दहशतवादी सिंडिकेटचा भाग झाले आहेत का? आता हे स्पष्ट झाले आहे की शेख शहाजहान हा केवळ बलात्कारी नव्हता तर तो एक दहशतवादीही होता. मुख्यमंत्र्यांनी बोललेच पाहिजे,’ असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.

संदेशखालीपासून सुमारे ३५किमी अंतरावर असलेल्या हसनाबाद येथील स्थानिक भाजप नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटाने सत्ताधारी तृणमूल आणि भाजपमध्ये वाक्युद्ध सुरू झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते दिलीप दास यांच्या घरी हा स्फोट झाला.हसनाबाद येथे शनिवारी सकाळी एका घरात झालेल्या स्फोटात एक महिला जखमी झाली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिला घरी सोडण्यात आले.

ममता यांनी या घटनेवर भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘आजही संदेशखालीजवळ एक घटना घडल्याचे ऐकले. भाजपच्या एका नेत्याने घरात बॉम्ब ठेवला होता. नोकऱ्या रद्द करून आणि बॉम्ब फोडून ते जिंकू शकत नाहीत. लोकांना रोटी, कपडा, मकान आणि नोकऱ्या हव्या आहेत, त्यांची भारदस्त भाषणे नव्हे,’ असे ममता म्हणाल्या. त्यावर भाजपने लगेच पलटवार केला. “पराभव जवळ आला आहे, हे जाणून तृणमूलचे नेते घाबरले आहेत. ते लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हसनाबाद प्रकरणातील स्फोटामागे तृणमूलची भूमिका आहे का, याची चौकशी झाली पाहिजे,’ असे भाजपचे नेते राहुल सिन्हा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा