34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरदेश दुनियाविक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल

विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल

एलआरए हे उपकरण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने केले विकसित

Google News Follow

Related

चांद्रयान ३ च्या लँडर विक्रमसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेले चौथे उपकरण लेझर रेट्रोफ्लेक्टर ऍरे (एलआरए) लँडरवरील अन्य उपकरणांनी विश्रांती घेतल्यानंतर तसेच, प्रज्ञान रोव्हरवरील अन्य दोन उपकरणे १४ दिवसांनी काम करेनाशी झाल्यावर स्वत:च्या कामाला सुरुवात करणार आहे. ही यंत्रे १४ दिवसांनी कार्यक्षम असणार नाहीत. एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस असतात. सध्या चंद्रावर दिवस असल्याने सूर्याच्या ऊर्जेच्या मदतीने येथे चांद्रयानाचे काम सुरू आहे. एलआरए हे उपकरण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने विकसित केले आहे.

 

विक्रम लँडरवर एलआरएसोबत ‘द रेडिओ ऍनॉटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह लोनोस्फीअर’, ‘ऍटमॉस्फीअर’ (राम्भा), चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करणारे ‘थर्मो फिजिकल एक्स्पिरीमेंट’ आणि ‘इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सिसमिक ऍक्टिव्हिटी (आयएलएसए) ही उपकरणे आहेत. ही सर्व उपकरणे इस्रोने विकसित केली आहेत. मात्र त्यातील केवळ एलआरए हे उपकरण नासाच्या गोड्डार्ड स्पेस फ्लाइट सेंटरने विकसित केले आहे.

हे ही वाचा:

भारताचा वार्षिक ७.८ टक्के विकासदर अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकासदरापेक्षा जास्त

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत दाखल

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

युवकांसाठी तू प्रेरणास्थान आहेस!

परिभ्रमण करणार्‍या अवकाशयानाच्या किरणोत्सारी किरणांमधून परावर्तित प्रकाश वापरून लँडरचे स्थान आणि कक्षेच्या संदर्भात चंद्राच्या पृष्ठभागावरील बिंदूपर्यंतचे अंतर अचूकपणे निर्धारित करण्यासाठी एलआरएची रचना करण्यात आली आहे. या उपकरणामुळे पृथ्वीच्या सापेक्ष चंद्राच्या हालचालींचे तपशील समजण्यास मदत होईल. एलआरएला कोणत्याही ऊर्जेची गरज नाही. भविष्यातील चांद्रमोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर अचूक उतरण्यासाठी या उपकरणाने मिळवलेल्या माहितीचा मोठा उपयोग होऊ शकेल.

 

 

चांद्रयान मोहिमेचे काम पूर्ण होईपर्यंत एलआरएचे काम सुरू करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती नासाचे अधिकारी डेव्हिड विल्यम्स यांनी दिली. त्यांना लँडरच्या अन्य उपकरणांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणायचा नसल्याने जेव्हा ही उपकरणे आपले कार्य बंद करतील, तेव्हाच एलआरएचे कार्य सुरू होणार आहे, असे विल्यम्स यांनी स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा