29 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरदेश दुनियाचीनमध्ये मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू

चीनमध्ये मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू

किंगदाओ शहरातील बेहाई शिपयार्डमधील घटना

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

चीनमधील किंगदाओ शहरातील बेहाई शिपयार्डमध्ये परदेशी ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. दुरुस्ती आणि देखभालीसाठी शिपयार्डमध्ये उभ्या असलेल्या जहाजाला अचानक आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने जहाजाचा मोठा भाग आपल्या कवेत घेतला. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, जहाजावर ४२ जण होते. या दुर्घटनेत किमान २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून काही जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जहाजावरील अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे जहाज लायबेरियाच्या ध्वजाखाली कार्यरत असल्याची माहिती आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
स्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य

भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर गोलवर्षाव!

काँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार

मोना अग्रवालला रौप्य, अवनी लेखराला कांस्य

या दुर्घटनेची गंभीर दखल चीनच्या प्रशासनाने घेतली असून बचावकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याबरोबरच आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जहाज दुरुस्ती केंद्रांमधील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यावरही भर दिला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे चीनमधील शिपयार्डमधील कामगारांची सुरक्षा आणि अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा