30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी...

पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने लागोपाठ तीन षटकार मारून विजयश्री खेचून आणली

पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ ९६ धावांत माघारी परतल्यामुळे टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या ऑस्ट्रेलियाचा आशा मावळल्या का, अशी शक्यता असताना मार्कस स्टॉइनिस (४०) आणि मॅथ्यू वेड (४१) यांनी कमाल केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी अभेद्य ८१ धावांची भागीदारी करत आपल्या संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. १९ व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकून मॅथ्यू वेडने पाकिस्तानकडून सामना खेचून नेला. तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारू पाहणाऱ्या पाक संघाला वेड लागायचेच बाकी होते.

शेवटच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलिया हव्या होत्या २२ धावा म्हणजे प्रत्येक षटकांत निदान ११. शाहीन आफ्रिदी १८वे षटक टाकत होता. पहिल्या चेंडूवर धाव काढण्यात मार्कस स्टॉइनिसला अपयश आले. दुसऱ्या चेंडूवर लेगबाय मिळाला. त्यानंतर मॅथ्यू वेडला यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू वाईड गेला आणि ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आणखी एक धाव जमा झाली. पुढच्या षटकांत वेडचा झेल हसन अलीच्या हातातून निसटला आणि सामनाही त्यांच्याकडून निसटून गेला. त्यानंतरच्या तीन चेंडूंवर वेडने सलग तीन षटकार खेचून सामन्याचे सारे चित्रच बदलून टाकले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ऑस्ट्रेलियाची १४ नोव्हेंबरला न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. प्रथमच टी-२० वर्ल्डकपचा एक नवा विजेता क्रिकेटजगताला मिळणार आहे.

त्याआधी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवान (६७), बाबर आझम (३९), फखर झमान (५५) यांच्या फलंदाजीमुळे पाकने ४ बाद १७६ धावा केल्या. या धावसंख्येला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची मात्र अवस्था १३व्या षटकापर्यंत बिकट बनली होती. त्यांचे पाच फलंदाज धावांचे शतक पूर्ण होण्याच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे मॅथ्यू वेड आणि स्टॉइनिस यांच्यावरच सारी मदार होती. पण या दोघांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. शिवाय, पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणातील त्रुटींचाही फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. १९ व्या षटकांत हसन अलीने वेडचा झेल टिपला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.

 

हे ही वाचा:

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

 

पण वेडने या १९व्या षटकांत २० धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.

स्कोअरबोर्ड : पाकिस्तान ४-१७६ (रिझवान ६७, बाबर ३९, फखर ५५, स्टार्क ३८-२, कमिन्स ३०-१, झम्पा २२-१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ५-१७७ (वॉर्नर ४९, मार्श २८, स्टॉइनिस ना. ४०, वेड ना. ४१, शादाब २६-४). सामनावीर : मॅथ्यू वेड

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा