26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारणनवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

Related

‘राज्यातील वक्फ बोर्डाच्या स्वच्छतेचे काम आम्ही हाती घेतले आहे. बोर्डाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांचीही तपासणी होत आहे. पारदर्शक कारभाराचा आमचा  प्रयत्न आहे. ईडीने जर या स्वच्छता अभियानात आम्हाला सहकार्य करायचे ठरविले असेल तर त्यांचे स्वागत आहे. पुण्यातील एन्डोवमेंट ट्रस्ट नाही तर ३० हजार वक्फच्या संस्था आहेत. त्यांनी या संस्थांचा तपास करावा,’ अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पुण्यातील वक्फ बोर्डाशी संबंधित सात जागांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर मलिक यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील खुलासा केला. ते म्हणाले की, क्लिन अप अभियानात ईडीचा सहयोग मिळत आहे, त्याचे स्वागत आहे. आम्ही स्वच्छता अभियान सुरू केले आहे. वक्फ बोर्डाची यापूर्वी मीटिंग होत नव्हती. पण आम्ही आता ऑनलाइन काम सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे हे काम दिले. आता काम डिजिटल होत आहे. ईडीने लखनौमध्येही जाऊन शिया कम्युनिटीच्या तक्रारी आहेत तिथेही लक्ष द्यावे असेही मलिक म्हणाले. आम्ही सहकार्य करू. पण प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असेल तर ते चुकीचे ठरेल. मलिक म्हणाले की, पुण्याची एक ट्रस्ट ताबूत इनाम एन्डोवमेंट ट्रस्ट मुळशी, पुणे जिल्हा वक्फ बोर्डाकडे ही संस्था रजिस्टर आहे.

पुण्यात एमआयडीसीने ५ हेक्टर ५१ आर जमीन लँड एक्विझिशन ऑफिसरकडे पैसे जमा केले. त्या एक्विझिशन ऑफिसरने श्री इम्तियाझ हुसेन शेख आणि इतर ट्रस्टी यांना ७ कोटी ७६ लाख ९८ हजार २५० रुपये अक्विझिशनचे पैसे म्हणून दिले. जिल्हाअधिकाऱ्यांकडे पैसे जमा झाले. बनावट कागदाच्या आधारावर ३०-१२-२०२० च्या कागदाचा वापर करून ७ कोटी एवढे पैसे आपल्या अकाऊंटला घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यावर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुणे डिव्हिजनचे जॉइन्ट सीईओ खुश्रु यांच्या माध्यमातून १३ ऑगस्ट २०२१ ला पुण्यातील बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर ५ लोकांना अटक झाली. त्यात चांद रमझान मुलानी, इम्तियाज शेख, कलीम सय्यद, राजगुरु, कांबळे यांचा समावेश होता.

 

हे ही वाचा:

राजकीय वातावरण तापलेले असतानाच नड्डा मुंबईत

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

अर्धनग्न एसटी कर्मचाऱ्यांनी केले ठाकरे सरकारला पूर्णनग्न

नवाब मलिकांच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्ड जमीन प्रकरणी ईडीच्या धाडी

 

खुश्रु हे पोलिस स्टेशनमध्ये गेले. तेव्हा पोलिस तक्रार लिहून घेत नव्हते. अमिताभ गुप्ता यांना फोन केल्यावर एका तासात एफआयआर दाखल झाला. आज यापैकी तीन लोकांना जामीन मिळाला आहे तर दोन कोठडीत आहेत. आज वक्फ बोर्डाने वर्षभरात ७ एफआयआर दाखल केले आहेत. एक ताबूत एन्डोमेंट पुणे, जुम्मा मशीद बदलापूर, दर्गा मशीद गैबी बीड, मशीद देवी नीमगाव बीड, दुर्गा बुऱ्हाण शहा परभणी, मशीद छोटा जालना, दर्गा नुरुल कब्रस्तान दिल्लीगेट औरंगाबाद ही सात एफआयआर आहेत. शिवाय, डेप्युटी कलेक्टर शेळके यांना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा