33 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरक्राईमनामामदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण

मदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चकवाल जिल्ह्यातील ढोके फुलारी गावात मदरशात शिकणाऱ्या मुलींचंच लैंगिक शोषण झालंय. आरोपी मौलानाने अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण तर केलेच शिवाय व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मागील ३ वर्षांपासून आरोपी मौलाना मदरशामधील मुलींचं शोषण करत होता. तसेच त्या मुलींची व्हिडीओ देखील करत होता. शोषण झालेल्यांमध्ये ४ मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे. ही सर्व मुलं मदरशात जात होती.

आरोपी मौलाना अनेक वर्षांपासून हा सर्व प्रकार करत होता. त्याने आतापर्यंत हे सर्व इतरांपासून लपवून ठेवले. मात्र, या गुन्ह्यात त्याचा सहकारी असलेल्या अन्य आरोपीसोबत त्याचं भांडण झालं आणि हा प्रकार उघड झाला. मुलांचं लैंगिक शोषण आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात मौलानासोबत हा सहकारी देखील सहभागी होता. मात्र, मौलानासोबत वाद झाल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत मौलानाची पोलखोल केली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’, लॉकडाऊनची घोषणा करणार?

दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत

तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

मौलानाचा सहकारी चकवाल उप पोलीस अधीक्षक सिकंदर गोंडल यांच्याकडे आला. त्याने सांगितलं की आम्ही चार मुलींचं आणि एका मुलाचं लैंगिक शोषण केलंय. या सर्वांचं वय ६ ते १२ वर्षांच्या दरम्यान आहे. त्याने पोलिसांना विश्वास व्हावा म्हणून व्हिडीओ देखील दाखवला. यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी पीडित मुलांशी देखील चर्चा केली. यात मौलानाने एकाचं पाच वेळा शोषण केल्याचं सांगितलं. तसेच मौलाना व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत शोषण करायचा असंही नमूद केलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा