पाकिस्तानी लष्कराचे सर्वोच्च जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी (सीजेसीएससी) चे अध्यक्ष शमशाद मिर्झा हे भारताविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी ओळखले जातात. गेल्या आठवड्यातच त्यांनी भारतीय लष्कर आणि भारताबद्दल अनेक निराधार विधाने केली. रविवारी ढाकाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, मुहम्मद युनूस आणि जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी बांगलादेश- पाकिस्तान संबंधांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली ज्यात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण सहकार्याचे वाढते महत्त्व समाविष्ट आहे.
गेल्या वर्षी बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आले. मोठ्या हिंसाचारानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना भारताशी असलेल्या जवळच्या संबंधांसाठी ओळखल्या जात होत्या. मात्र, आता सत्तापालट झाल्यानंतर पाकिस्तान अधिक बांगलादेशशी जवळीक वाढवत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस देखील कट्टरपंथीयांबद्दल उदार राहिले आहेत. पाकिस्तान बांगलादेशशी लष्करी सहकार्य मजबूत करू इच्छित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानी सैन्य हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
शमशाद मिर्झा यांचा ढाका दौरा हा बांगलादेशशी पुन्हा संपर्क साधण्याच्या पाकिस्तानच्या नियोजित प्रयत्नांचा एक भाग आहे. जरी ढाका म्हणत असला तरी ही बैठक प्रादेशिक संवाद मजबूत करण्यासाठी आणि संरक्षण कूटनीति तसेच परस्पर समंजसपणाद्वारे सहकार्य वाढवण्याच्या पाकिस्तानच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, परंतु गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन न्यूज-१८ ने म्हटले आहे की जनरल मिर्झा यांचे हे पाऊल ढाकाशी पुन्हा संपर्क साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.
हे ही वाचा :
भारतात वॉन्टेड असलेला झाकीर नाईक पाकिस्ताननंतर करणार बांगलादेशचा दौरा
ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर बलात्कार
भारतासोबतचे संबंध बिघडवून पाकिस्तानशी मैत्री नाही!
नालासोपाऱ्यात एमडी ड्रग्ज फॅक्टरी उध्वस्त ; १४ कोटींचा माल जप्त, पाच जणांना अटक
पाकिस्तान प्रत्यक्षात बांगलादेशसोबत जुने राजनैतिक मार्ग पुन्हा सुरू करून, स्वतःला उदारमतवादी देश म्हणून सादर करून आणि नवी दिल्लीपासून पुढे जाण्याच्या ढाकाच्या इच्छेची चाचणी घेऊन भारताचा प्रादेशिक प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. १९७१ नंतर बांगलादेशमध्ये पाकिस्तानची ही पहिली उच्चस्तरीय लष्करी बैठक आहे. या बैठकीत दक्षिण आशियाई मुस्लिम बहुल देशांना एकत्र करण्यासाठी इस्लामिक सहकार्य संघटने (OIC) सारखा गट तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.







