बिहार विधानसभा निवडणुकांची धूम सध्या चांगलीच रंगली आहे. मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना राजकारण्यांमध्ये जोरदार टीका टिप्पणी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राजद नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कृष्णम यांनी दावा केला की, तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सरकारची स्थापना झाल्यास बिहारमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, “तेजस्वी यादव हे विसरले आहेत की मुख्यमंत्री जनता निवडते, पक्ष फक्त मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवतो. त्यांनी त्यांचे हेतू स्पष्ट केले आहेत. जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले, तर वक्फ कायद्याचा प्रश्नच राहणार नाही, कारण ते बिहारमध्ये शरिया कायदा लागू करतील.”
दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पाटणा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी बिहारला विश्वासघात करण्यासाठी येत आहेत. केवळ भेटी आणि रॅलींमुळे वास्तव बदलणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “सर्वांना माहित आहे की ते बिहारला विश्वासघात करण्यासाठी येत आहेत. आम्हाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की, गेल्या ११ वर्षांत तुम्ही गुजरातला काय दिले आणि बिहारला काय दिले? आम्हाला फक्त हिशेब हवा आहे.”
हे ही वाचा :
भारतात वॉन्टेड असलेला झाकीर नाईक पाकिस्ताननंतर करणार बांगलादेशचा दौरा
ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर बलात्कार
महिला विश्वचषक: इंदूरमधील छळाच्या घटनेनंतर नवी मुंबईत सुरक्षा वाढवली!
पंतप्रधान मोदींचा ३० ऑक्टोबर रोजी दौरा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी शनिवारी पुष्टी केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून ३० ऑक्टोबर रोजी बिहारला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुझफ्फरपूर आणि छपरा येथील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.







