29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरदेश दुनियाबांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

२ लाख ९ हजार लोकांना आजाराची लागण

Google News Follow

Related

डेंग्यूच्या साथीने बांगलादेशात थैमान घातले आहे. डेंग्यूच्या तापामुळं तब्बल १ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी चारपट अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

माहितीनुसार, २०२३ या वर्षी पहिल्या नऊ महिन्यात १ हजार १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २ लाख ९ हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे. २००० साली आलेल्या डेंग्यूच्या महामारीनंतर यंदाच्या वर्षी डेंग्यूने बांगलादेशात गोंधळ उडवला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये १५ वर्षीय ११२ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर काही नवजात बालकांचाही समावेश आहे.

बांगलादेशातील रुग्णालयांमध्ये डेंग्युच्या आजाराच्या रुग्णांवर उपाचारांसाठी बेड कमी पडत आहेत. रुग्णांना ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, स्थायूंचे दुखणे आणि इतर गंभीर लक्षणांमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अद्याप डेंग्यू आजारावर लस आलेली नाही. मात्र, हा आजार दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर महिन्यात पसरतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहतं आणि साठलेल्या पाण्यात डासांची पैदास झाल्याने हा आजार होतो.

हे ही वाचा:

चिनी फंडींग प्रकरणी ‘न्यूज क्लिक’मधील पत्रकारांच्या घरांवर छापेमारी

घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…

ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!

‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’

बांगलादेशात १९६० सालापासून डेंग्यूची विक्रमी आकडेवारी नोंदवली जात आहे. २००० मध्ये या आकडेवारीने उच्चांक गाठला होता. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा