25 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरविशेषडॉ. धनंजय दातार यांचा 'आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड' पुरस्काराने गौरव

डॉ. धनंजय दातार यांचा ‘आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड’ पुरस्काराने गौरव

दुबईमध्ये रंगला पुरस्कार सोहळा

Google News Follow

Related

अदील ग्रुप ऑफ सुपरमार्केट्सचे संस्थापक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रीटेल उद्योगातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल इंडिया टुडे समूहातर्फे प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ दुबई ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. दातार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी इंडिया टुडे समूहाचे राजदीप सरदेसाई, नबिला जमील, अंजना ओम कश्यप व श्वेता सिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्सचा ५० हून अधिक रीटेल सुपर मार्केट्स, पिठाच्या गिरण्या व मसाला कारखाने असा विस्तार आहे. आखाती देशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थाईक झालेल्या भारतीय समुदायाच्या वैविध्यपूर्ण चवींची पूर्तता करणारी उच्च दर्जाची खाद्य उत्पादने रास्त किंमतीत पुरवण्यात हा समूह महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. अस्सल स्वाद व काटेकोर दर्जा निकष राखत अस्सल उत्पादने पुरवण्याची बांधीलकी डॉ. दातार यांनी कायम निभावल्याने त्यांना संयुक्त अरब अमिरातीतील भारतीयांमध्ये प्रेमादराचे स्थान प्राप्त झाले आहे.

हेही वाचा..

सुंदर दिसण्याच्या महत्त्वाकांक्षेने केला श्रीदेवीचा घात?

मोदी कडाडले; विरोधकांकडून जातीपातीच्या आधारावर समाजाची विभागणी

आशियाई स्पर्धेत नेपाळला नमवत भारताची उपांत्य फेरीत धडक

नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

आयकॉन ऑफ दुबई हा पुरस्कार केवळ डॉ. दातार यांच्या यशाचाच गौरव नसून त्यातून भारतीय समुदायाच्या खाद्य अनुभवाला समृद्ध बनवण्याप्रती त्यांची कटिबद्धताही अधोरेखित होते. व्यवसायात उत्कृष्टता व समाजसेवेप्रती बांधीलकी जोपासण्यात डॉ. धनंजय दातार करत असलेल्या अखंड परिश्रमांनी रीटेल क्षेत्रात गुणवत्तेचा एक वाखाणण्याजोगा मापदंड स्थापित झाला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, आयकॉन ऑफ दुबई पुरस्कार मी नम्रतेने स्वीकारत आहे. दर्जेदार उत्पादने देऊन व भारताचा अस्सल स्वाद राखून आपल्या समुदायाची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला मिळालेला हा पुरस्कार एकप्रकारे संपूर्ण अदील परिवाराचे परिश्रम व समर्पितता यांचाच पुरावा आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा