टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांना ग्रूमिंग गँगच्या विरोधात कारवाई न केल्याबद्दल लक्ष्य केले होते. त्यांनी केलेल्या टीकेमुळे ग्रूमिंग गँग आणि त्यांच्या कारवाया जगभरात चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे.
ब्रिटनमध्ये बलात्कारी आणि पाकिस्तानी वंशाच्या गुन्हेगारांबद्दल चर्चा सुरू असून ब्रिटनमधील खासदाराने सरकारकडे मागणी केली आहे की, सर्व पाकिस्तानी गुन्हेगारांना देशाबाहेर हाकलून लावा. ग्रेट यार्माउथचे खासदार रूपर्ट लोव हे बऱ्याच काळापासून ब्रिटनमध्ये येणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या लोकांविरुद्ध मोहीम राबवत आहेत. त्यांनी अलिकडेच एक तपास अहवाल समोर आणला होता ज्यात म्हटले आहे की देशभरात ८५ भाग आहेत जिथे बलात्काऱ्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या निष्पाप मुलींना बळी पाडत आहेत. तसेच अहवालात म्हटले आहे की या टोळ्यांमध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी वंशाचे पुरुष आहेत. एलोन मस्क यांनीही रूपर्ट लोव यांच्या चौकशीला पाठिंबा देताना ब्रिटिश सरकारवर निशाणा साधला होता.
If the Government is serious about their deportation threats, then start with Pakistan.
Not a single visa issued to Pakistan until they accept every single deported rapist/criminal.
Whilst you're there, scrap every penny of foreign aid sent to the Pakistanis.
Not complicated.
— Rupert Lowe MP (@RupertLowe10) September 8, 2025
हे ही वाचा :
नेपाळ निदर्शने: सरकारच्या कारवाईचा निषेध करत कृषिमंत्र्यांचा राजीनामा
“नेपाळमध्ये असंतोष कायम; सोशल मीडिया सुरु होताच पुन्हा जनआंदोलन पेटलं”
“सावधगिरी बाळगा! नेपाळमधील हिंसक निदर्शनांमुळे भारत सरकारची नागरिकांना सूचना”
६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्रा यांना समन्स
रूपर्ट लोव यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, जर सरकार हद्दपारीच्या धमक्या गांभीर्याने घेत असेल तर पाकिस्तानपासून सुरुवात करा. हद्दपार झालेल्या बलात्काऱ्याला किंवा गुन्हेगाराला स्वीकारेपर्यंत पाकिस्तानला एकही व्हिसा देऊ नका. तसेच, पाकिस्तानला जाणाऱ्या परदेशी मदतीचा प्रत्येक पैसा बंद करा. ते इतके कठीण नाही. या विधानाचा संदर्भ हा ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री शबाना महमूद यांच्या घोषणेशी संबंधित आहे. शबाना महमूद या पाकिस्तानी वंशाच्या मुस्लिम खासदार असून काही दिवसांपूर्वीच त्यांची ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले होते की, जे देश त्यांच्या बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आणि गुन्हेगार नागरिकांना परत घेण्यास नकार देतात त्यांच्याविरुद्ध व्हिसा निलंबनासारखे कठोर उपाय करण्यात येतील.







