34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरदेश दुनियामहिला आयोग म्हणतो, चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवा!

महिला आयोग म्हणतो, चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवा!

Related

पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत चन्नी यांच्या डोक्यावर मुकुट चढविण्यात आला. पण आता चन्नी यांचे जुने वाद उफाळून आले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, रविवारी जेव्हा चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा पक्षात सर्व सुरळीत होईल अशी आशा होती. परंतु असे न घडता, घडले भलतेच. चन्नी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडून पक्ष सर्व बाजूंनी गोत्यात आलेला आहे. त्यांना मुख्यमंत्री पद मिळताच चन्नी यांच्यावरील ‘मी टू’ची टूम पुन्हा निघाली आहे. या प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्ष काँग्रेसवर हल्ला करत असताना, आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही चन्नी यांना मुख्यमंत्रीपद दिल्याबद्दल लक्ष्य केले आहे.

चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की, एका महिलेच्या नेतृत्वाखालील पक्षाने त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्री बनवले आहे. जो एक प्रकारचा विश्वासघात आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

चाळीसपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार ही घसघशीत वाढ

काय आहे सीडीएस बिपीन रावत यांनी सांगितलेला ‘संस्कृतींचा संघर्ष’?

येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील

रेखा शर्मा यांनी चन्नीला महिलांच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आणि तसेच त्यांच्याविरोधात चौकशीची मागणीही केली आहे. रेखा शर्मा पुढे म्हणाल्या की, ते मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा पुढे म्हणाल्या, ‘मी सोनिया गांधींना चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्याची विनंती करते.’ त्यांच्यावर मीटू सारखे गंभीर आरोप झालेले आहेत. तसेच राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि हटवण्याची मागणी करत आंदोलनही केले. परंतु या प्रकरणात काहीही झाले नाही. मात्र, चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यावर काँग्रेस चारही बाजूंनी चांगली गोत्यात आलेली आहे हे मात्र नक्की…

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा