31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरदेश दुनियाकच्चथीवू बेटाप्रमाणेचं नेहरूंनी कोको बेटे म्यानमारला दिली!

कच्चथीवू बेटाप्रमाणेचं नेहरूंनी कोको बेटे म्यानमारला दिली!

अंदमान आणि निकोबार बेट मतदारसंघातून भाजपाचे लोकसभा उमेदवार बिष्णू पद रे यांचा आरोप

Google News Follow

Related

काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १९७४ मध्ये श्रीलंकेला भारताचा अधिकार असलेले कच्चथीवू बेट देऊ केले होते. यावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला होता. अशातच आता आणखी एका बेटावरून नवा वाद सुरू झाला आहे. भाजपाचे बिष्णू पद रे यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोको बेटे म्यानमारला दिल्याचा आरोप केला आहे. बिष्णूपद रे हे अंदमान आणि निकोबार बेट मतदारसंघातून भाजपाचे लोकसभा उमेदवार आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बिष्णू पद रे म्हणाले की, “काँग्रेसने नेहमीच देशविरोधी भावनांना आश्रय दिला आहे. नेहरूंनी उत्तर अंदमान बेटांचा भाग असलेली कोको बेटे म्यानमारला भेट दिली, जी सध्या चीनच्या थेट नियंत्रणाखाली आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसने सत्तेत असताना ७० वर्षांत या बेटांसंदर्भात कोणत्याही प्रकारची चिंता वा काळजी व्यक्त केली नाही, असेही ते म्हणाले.

“आज केंद्र सरकार इंदिरा पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅम्पबेल खाडीमध्ये चीनचा सामना करण्यासाठी एक गोदी आणि दोन संरक्षण विमानतळ यांची निर्मिती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने संरक्षण यंत्रणेसाठी जो निधी पुरवला आहे, त्याप्रकारच्या निधीची कल्पना काँग्रेस पक्ष करूही शकत नाही,” अशी टीका भाजपा नेते रे यांनी केली आहे. कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याने या बेट समूहांना भेट देण्याची तसदीही यापूर्वी कधी घेतलेली नाही. असेही ते म्हणाले. परंतु पंतप्रधान मोदींनी नियमित भेटी दिल्या, असं रे यांनी स्पष्ट केले आहे.

कोको बेटांचे स्थान भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांपासून जवळपास ५५ किमी अंतरावर आहे. कोको बेटे म्यानमारच्या यंगून प्रदेशाचा एक भाग असून ही बेटे यंगूनच्या दक्षिणेस ४१४ किमी अंतरावर आहेत. या बेटांवर भरपूर नारळाची झाडे असल्याने त्यांना ‘कोको बेट समूह’ असे म्हटले जाते.

कोको बेटांचा समूह बंगालचा उपसागर आणि मलाक्काची सामुद्रधुनी दरम्यान मुख्य सागरी व्यापारी मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी स्थित आहेत. ही बेटे दक्षिणेकडील अंदमान आणि निकोबार बेटांमधील भारतीय नौदल आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण सुविधा आणि पूर्व हिंदी महासागरात भारतीय नौदल आणि इतर नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक उत्तम स्थान आहेत. कोको बेटांवरून भारताच्या तीन मुख्य स्थानांवर लक्ष ठेवता येते. ओडिशा व्हीलर बेट, विशाखापट्टणम आणि अंदमान येथील भारतीय लष्करी तळ यावर लक्ष ठेवता येते.

हे ही वाचा:

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं तरी या बेटांचा ब्रिटिशांकडे होता. पुढे सरदार वल्लभाई पटेल यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत ब्रिटीश साम्राज्याने लक्षद्वीप आणि अंदमान बेटांवर आपली पकड सोडल्यामुळे त्यांनी आपले लक्ष बंगालच्या उपसागरातील कोको बंदराकडे वळवले. सरदार पटेल यांच्यशी झालेल्या वाटाघाटीतील पराभवामुळे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सरदार पटेल यांच्याशी याबाबतीत चर्चा न करता, १९ जुलै, १९४७ हे प्रकरण नेहरूंकडे नेले आणि ही बेटे दळणवळणाच्या उद्देशाने ब्रिटनला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पुढे नेहरूंनी १९५० मध्ये म्यानमारला (बर्मा) कोको बेटे भेट दिली, असे ऐतिहासिक कागदपत्रातून समोर येत आहे. सध्या म्यानमारला आर्थिक मदत करत या बेटांचा ताबा चीनने स्वतःकडे घेतला असून भारत आणि भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीन या बेटांचा वापर करत आहे. चीनच्या या परिसरातील वाढलेल्या कारवायांमुळे भारताच्या सीमा सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा