28 C
Mumbai
Sunday, November 10, 2024
घरराजकारणएकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नांदेड आणि परभणीमधून विरोधकांवर जोरदार निशाणा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २० एप्रिल रोजी महाराष्ट्र दौरा करत नांदेड आणि परभणी अशा दोन ठिकाणी भव्य सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नांदेडमधील सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय. सर्वाना राम राम.. नांदेड आणि हिंगोली कराना माझा नमस्कार. २६ तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. तसेच परभणी येथे सभेवेळीही त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान झाले असून याच मतदानातून देशाचे भविष्य ठरत असते, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. गरीब, शेतकरी, मजदूर आणि सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड काँग्रेसकडून भींत टाकली जाते. आजही एनडीए सरकारकडून होत असलेल्या गरीबांच्या विकासकामांची खिल्ली उडवली जाते, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्कारला

निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्कारला आहे. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमदेवार आपआपसात निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कामानंतर मोदी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करणे, ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मराठवाड्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला.

इंडिया आघाडीचे लोक आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत, हे लोकांनाही समजत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मतदारांनी इंडिया आघाडीला नाकारले. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? जे लोक स्वतःच्या आघाडीतच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत केली आहे.

कुणालाही मतदान करा, पण करा

भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. देशातील लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “काल देशात पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. मी सर्व मतदार आणि विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. मतदानानंतर अनेकांनी बुथ स्तरापर्यंतचे विश्लेषण केले आहे. ते पाहता पहिल्या टप्प्यात एनडीएच्या पारड्यात एकतर्फी मतदान झाले असल्याचे दिसते. मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की, एनडीएचा विजय तुम्ही पक्का करत आहातच. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पण जे लोक मतदान करत नाहीत, त्यांनाही सांगू इच्छितो की, तुम्ही कुणालाही मतदान करा. पण मतदान करण्यापासून मागे हटू नका.”

विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, भलेही तुम्ही निवडणुकीत पराभूत होणार असाल तरीही मतदानासाठी लोकांना जागृत करा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुम्हालाही यश मिळेलच. त्यामुळे पराभूत होणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मी प्रेरीत करू इच्छितो”, असा खोचक टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.

काँग्रेसचे कुटुंबीय निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाहीत

“राहुल गांधी हे वायनाड वगळता आणखी इतर ठिकाणी सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. ज्याप्रमाणे त्यांना अमेठी सोडावी लागली. त्याप्रमाणे ते वायनाडही सोडतील. काँग्रेसचे कुटुंबीय या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही. कारण ज्याठिकाणी ते राहतात, त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही. काँग्रेसची अशी अवस्था होईल, असा विचार त्यांनीही केला नसेल. ज्या परिवारावाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, तो परिवारही स्वतःच्या पक्षाला मतदान करू शकत नाही, अशी अवस्था आहे,” अशी खरमरीत टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली आहे.

मोदींकडून महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख

नांदेड लोकसभेच्या प्रचार सभेनंतर नरेंद्र मोदी यांनी परभणी लोकसभेत प्रचार सभा घेतली. परभणीमध्ये महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत. “महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत. त्यांना तुम्ही लोकसभेत पाठविणार की नाही?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला. तसेच मोदी यांनी आपल्या खिशातून शिटी काढून महादेव जानकर यांच्या हातात दिली. जानकर हे रासपच्या ‘शिटी’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

आपल्या संस्कृतीचा जिवंतपणा दाखवणाऱ्या पावलांनाही काँग्रेसचा विरोध

तर, पुढे सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काँग्रेसपासून सावध राहिले पाहिजे. भारताची फाळणी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेविरुद्ध कलम ३७० लागू करणे ही काँग्रेसची फूट पाडणारी धोरणेच कारणीभूत आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेस आणि त्यांचे मित्र भारताच्या संस्कृतीचा तिरस्कार करतात. नौदलाच्या ध्वजावर तिरंगा जोडला तो आमच्या सरकारनेच. भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रतिबिंबित केले आहे याची आमच्या सरकारने खात्री केली. पण आपल्या संस्कृतीचा जिवंतपणा दाखवणाऱ्या या पावलांनाही काँग्रेस विरोध करते आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

परभणीतील १२ लाख लोकांना मोफत रेशन

“आमच्या सरकारच्या धोरणांमुळे परभणीतील १२ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कुटुंबातील कुणालाही उपाशी झोपावं लागत नाही. पुढील पाच वर्षातही असेच मोफत रेशन मिळत राहिल. तसेच परभणीत १७ जनऔषधी केंद्रातून औषधांवर ८० टक्के सूट मिळत असून सव्वा लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. कोणतेही सरकार हे काम तेव्हाच करू शकते, जेव्हा ते गरीबांप्रती संवेदनशील असते,” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा