27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरराजकारणमिसिंग लिंकचे नुकसान नाही, प्रवेशद्वारावरील स्लॅब दरडीमुळे कोसळला

मिसिंग लिंकचे नुकसान नाही, प्रवेशद्वारावरील स्लॅब दरडीमुळे कोसळला

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले स्पष्टीकरण

Google News Follow

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सोमवारी मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळलेल्या ठिकाणाला भेट देऊन परिस्थितीची सविस्तर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी मिसिंग लिंक तथा कनेक्टिंग लिंकचे नुकसान झालेले नसून त्याच्या कमानीवरील स्लॅब दरडीमुळे कोसळल्याचे स्पष्ट केले.

स्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्र्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड उतारावरून घसरून खाली आले. त्यांनी स्पष्ट केले की, मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या (टनेल) मुख्य संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, प्रवेशद्वाराजवळ सौंदर्यीकरणासाठी बसविण्यात आलेला स्लॅब आणि संरक्षक रिटेनिंग वॉलचा (आधारभिंतीचा) काही भाग कोसळला आहे.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे म्हणतात, महाराष्ट्रात आणीबाणी घोषित करा!

गांगुलींच्या एका निर्णयाने बदलले धोनीचे नशीब

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध! ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!

मंत्र्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे डोंगराच्या उताराची अचूक स्थिती तपासणे शक्य झालेले नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येईल. तपासणीनंतर पाण्याच्या प्रवाहात बदल का झाला, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाय करावेत, याबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅबसह सर्व मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांना हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढे सांगितले की, पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त सुरक्षा तपासणीनंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, पुढील सर्व निर्णयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा