30 C
Mumbai
Thursday, August 27, 2026
घरदेश दुनियानेपाळमध्ये महापुराचा कहर; २८८ भारतीयांशी संपर्क तुटला

नेपाळमध्ये महापुराचा कहर; २८८ भारतीयांशी संपर्क तुटला

तिबेटमध्ये २०० भारतीय अडकले, बचावकार्य युद्धपातळीवर

Google News Follow

Related

नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, तब्बल २८८ भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. याशिवाय सुमारे २०० भारतीय नागरिक तिबेटच्या चिनी भागात अडकून पडल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या आपत्तीनंतर भारत सरकारने नेपाळच्या प्रशासनाशी समन्वय साधत बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. आतापर्यंत २१ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी परिसरात अचानक आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला. भोटेकोशी नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्यानंतर पाणी आणि चिखलाचा प्रचंड लोंढा परिसरात घुसला. अनेक रस्ते, पूल आणि इमारती वाहून गेल्याने सीमावर्ती भागाचा संपर्क तुटला आहे. या दुर्घटनेमुळे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले अनेक भारतीय यात्रेकरूही संकटात सापडले आहेत.
हे ही वाचा:
ओणमच्या उत्साहात केरळमध्ये दारूविक्रीचा विक्रम

सणासुदीपूर्वी कांद्याच्या दरवाढीला ब्रेक; केंद्राचा बफर स्टॉक बाजारात

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं; सहपायलटसह पायलटचा मृत्यू

इमारतीवरून पडलेली महिला झाडावर अडकली

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, संपर्क तुटलेल्या भारतीयांमध्ये त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या ७३ जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर तमिळनाडूतील ३७ जणांचा एक गट आणि आणखी ४९ भारतीयांचा दुसरा गटही बेपत्ता किंवा संपर्काबाहेर आहे. पश्चिम बंगालमधील ३२ जणांचा गट, विविध राज्यांतील ६१ जणांचा गट आणि केरळमधील ३३ भारतीयांचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, तिबेटच्या बाजूला अडकलेल्या सुमारे २०० भारतीयांनी मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधला आहे. सीमावर्ती भागातील रस्ते आणि दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. भारतीय अधिकारी नेपाळ आणि चीनमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क ठेवून बचावकार्याला गती देत आहेत.

या नैसर्गिक आपत्तीची व्याप्ती केवळ भारतीय नागरिकांपुरती मर्यादित नाही. नेपाळमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा २७० वर पोहोचला असून शेकडो, किंबहुना हजारो नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. ८०० हून अधिक अडकलेल्या नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. पुरामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर चिखल साचला असून रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी संवाद साधून भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने नेपाळला मदतसामग्रीही पाठवली आहे. आता सर्वांचे लक्ष बेपत्ता भारतीयांचा शोध, तिबेटमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुरक्षित सुटका आणि या विनाशकारी पुरानंतर सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्याकडे लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा