29 C
Mumbai
Thursday, April 15, 2021
घर देश दुनिया भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी न्युझीलँडच्या सीमा बंद

भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी न्युझीलँडच्या सीमा बंद

Related

न्युझीलँडने सध्या तात्पुरत्या काळासाठी भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बंदी घातली आहे. यात न्युझीलँडचे नागरिक असलेल्यांचा देखील समावेश आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

न्युझीलँडमध्ये त्यांच्या सीमेवर २३ कोविड रुग्ण आढळले, ज्यापैकी १७ रुग्ण भारतातून आलेले होते.

न्युझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेरेन यांनी ऑकलँडमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही तात्पुरत्या काळासाठी भारतातून न्युझीलँडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालत आहोत.”

हे ही वाचा:

वाझेला जिलेटीन पुरवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा

अनिल परबांनी राजीनामा द्यावा

काय डेंजर वारा सुटलाय

भारतात अमेरिका आणि ब्राझिलच्या खालोखाल सर्वात जास्त कोविड-१९चे रुग्ण आहेत. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ सप्टेंबर महिन्यात नोंदली गेली होती, ज्यापेक्षा अधिक रुग्णवाढ या आठवड्यात नोंदली गेली.

ही बंदी स्थानिक वेळेनुसार ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरू होईल. न्युझीलँडने प्रथमच आपल्या नागरिकांसाठी देखील स्वतःच्या सीमा बंद केल्या आहेत. या काळात, कोविड रुग्णांचा धोका कसा कमी करता येईल या बाबत विचार केला जाणार असल्याचे आर्डेरन यांनी सांगितले.

न्युझीलँडने या विषाणुचा पूर्ण पराभव केला होता. गेल्या चाळीस दिवसात या देशात एकही स्थानिक पातळीवरील सामाजिक संसर्गाची घटना घडली नव्हती. परंतु भारतातून आलेल्या मोठ्या प्रमाणातील लोकांमध्ये संसर्ग आढळून आल्यानंतर न्युझीलँडने पुन्हा एकदा आपल्या सीमा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,466चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
873सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा