28.5 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामाकॅलिफोर्नियात चर्चमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

कॅलिफोर्नियात चर्चमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

Google News Follow

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार घडल्याची घटना घडली आहे. कॅलिफोर्नियामधील एका चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून या दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. एका व्यक्तीने अचानक चर्चमध्ये घुसून गोळीबार केला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

लगुना वुड्स शहरातील जिनिव्हा प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी चर्चमध्ये ३० जण उपस्थित होती. गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीकडून हत्यार जप्त केले आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने द्वेषातून ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही

अमेरिकेत शनिवारीही न्यूयॉर्कमध्ये बफेलो येथे एका व्यक्तीने एका सुपरमार्केटमध्ये अंदाधूंद गोळीबार केला. यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाला, तसेच तीन लोक जखमी झाले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा