बांगलादेशातील प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला झाल्यानंतर काही दिवसांनी, आणखी एका माध्यम संस्थेला धमकी देण्यात आली आहे. यामुळे मुक्त वृत्तपत्रांवर दबाव वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, अनेक तरुणांनी ढाका येथील ग्लोबल टीव्ही बांगलादेशच्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यांच्या वृत्त प्रमुख नाजनीन मुन्नी यांना काढून टाकण्याची मागणी केली, अन्यथा त्यांना प्रथम आलो आणि द डेली स्टारसारखेच भवितव्य भोगावे लागेल, अशी धमकी दिली.
बंगलादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर काही वृत्तपत्रांच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले. कार्यालयांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. अशातच आता आणखी एका माध्यम संस्थेला धमकी मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्लोबल टीव्ही बांगलादेशच्या कार्यालयाला भेट देऊन काही तरुणांनी त्यांच्या वृत्त प्रमुख नाजनीन मुन्नी यांना काढून टाकण्याची मागणी केली, अन्यथा त्यांना प्रथम आलो आणि द डेली स्टारसारखेच भवितव्य भोगावे लागेल, अशी धमकी दिली. या तरुणांनी भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीचे सदस्य असल्याचा दावा केला आहे. मात्र, संघटनेने या घटनेपासून स्वतःला दूर ठेवले आहे. संघटनेचे अध्यक्ष रिफत रशीद म्हणाले की, सदस्यांवर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा..
भारताची अंतराळात मोठी झेप! इस्रोकडून सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित
मदरसा विधेयकाची माघार घेण्यास योगी मंत्रिमंडळाची मंजुरी
डीएमकेला सत्तेतून हटवणे हेच आमचे लक्ष्य
छत्तीसगड : मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
भारतविरोधी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अशांततेचा उद्रेक झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी, प्रथम आलो आणि द डेली स्टारच्या कार्यालयांची तोडफोड करून आग लावण्यात आली. काही पत्रकारांना देखील वेठीस ठेवण्यात आले. दीपू दास या हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. यामुळे बंगलादेशमधील हिंसाचाराकडे जगाचे लक्ष वेधले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही बांगलादेशमधील युनूस सरकारला नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता राखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.







