सीरियातील लताकिया आणि टार्टस येथे गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे. याच दरम्यान दोन दिवसात झालेल्या हिसाचारात तब्बल १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील युद्धावर लक्ष ठेवणाऱ्या संस्था ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ने ही माहिती दिली. २०११ मध्ये झालेल्या सिरीया गृह युद्धानंतरचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत सुरक्षा दलांनी अलावाइट मुस्लिम समुदायातील ७४५ हून अधिक लोकांना ठार मारले आहे. त्यापैकी बहुतेकांना फाशी देण्यात आली आहे. याशिवाय, माजी राष्ट्राध्यक्ष असदचे १४८ समर्थक मारले गेले. तर या हिंसाचारात १२५ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बशर देश सोडून रशियाला पळून गेला. यानंतर, हयात तहरीर अल-शाम (HTS) या दहशतवादी संघटनेने सीरियातील सत्ता हाती घेतली.
सीरियन सरकारचे म्हणणे आहे की, असदच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला, ज्यामुळे हिंसाचार भडकला. वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चकमक सुरू झाली. यानंतर, सरकारने लताकिया आणि टार्टसमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. तसेच, कर्फ्यू लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
‘पंचायत सीजन 3’ बनली बेस्ट सीरीज, जितेंद्र कुमार सर्वोत्तम
जीएसटी दरांमध्ये कपात करून कर प्रणाली अधिक सुकर होणार
कॅलिफोर्नियामध्ये BAPS हिंदू मंदिराची तोडफोड: “भारतविरोधी” संदेश लिहिले!
ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या आहूजाला अटक
लताकिया आणि टार्टस प्रांतातील हिंसाचारामुळे अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हे भाग माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याशी निष्ठावंत राहिलेल्या अलावाइट समुदायाचे गड आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल-असद यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर सीरियातील हा सर्वात हिंसक संघर्ष आहे.
अलिकडेच, सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सने २०२१ च्या त्यांच्या अहवालात म्हटले होते की सीरियामध्ये बशर अल-असद यांच्या राजवटीत तुरुंगात १ लाखांहून अधिक लोक मारले गेले होते. यापैकी ३० हजारांहून अधिक लोक एकट्या सैदनाया तुरुंगात मारले गेले. हे तुरुंग छळ, खून आणि बेपत्ता होण्यांसाठी प्रसिद्ध आहे.