राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील गंगाड तलाई तहसीलमधील झांबुधी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सोढाला दुडा गावातील ४५ कुटुंबांनी घरवापसी केली आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी ४०-४५ हिंदू कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. अखेर ही संपूर्ण कुटुंबे ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मात परतली आहेत.
गौतम गार्सिया यांनी सांगितले की, पूर्वी ते ख्रिश्चन होते, पण आता त्यांनी स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तो पुढे म्हणाला, आम्हाला ख्रिश्चन समुदायाकडून पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते आणि ख्रिश्चन कुटुंबे गुजरातमधील दाहोद येथून चर्च बांधण्यासाठी येथे आली होती. तथापि, आता गौतमने आपल्या गावातील जमिनीवर भैरवजींचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (९ मार्च) भैरवजींच्या मूर्तीची स्थापना केली जाईल आणि हिंदू विधीनुसार पूजा केली जाणार असल्याचे त्याने सांगितले.
मंदिरातील भिंतीवर गावातील तरुणांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणा लिहिल्या. गौतमने मंदिरावर भगवान श्री रामाचा ध्वज फडकवला आणि ‘जय श्री राम’ असा जयघोष केला. या संपूर्ण घटनेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोक या बदलाबद्दल खूप आनंदी आहेत.
तो पुढे म्हणाले, गावातील लोक आता जागरूक झाले आहेत आणि त्यांना समजले आहे की धर्मांतरामागे पैशाचा लोभ होता. त्याने असेही सांगितले कि ख्रिश्चन समुदायाच्या पाद्रीने त्यांना फोन करून सांगितले की ते चुकीचे करत आहेत. मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्याने सांगितले.
हे ही वाचा :
औरंगजेब कबरीविरोधात आंदोलनासाठी हिंदू एकता पदाधिकाऱ्यांना जिल्हा बंदीच्या नोटीसा
इंडियन वेल्स: ५ वेळा चॅम्पियन जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत
भारत नेहमी प्राण्यांच्या संरक्षणात आघाडीवर
पाकिस्तानातील सिंध प्रांत पेटला, सरकारविरोधी आंदोलन चिघळले
दरम्यान, गावात आता धर्मांतराच्या सत्यतेबद्दल जागरूकता वाढली आहे आणि लोकांना समजू लागले आहे की पैशाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतर झाले आहे. आता हा समुदाय आपल्या मूळ धर्माकडे, हिंदू सनातन धर्माकडे परतला आहे आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.