हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने चलो संभाजीनगर खुलताबाद येथील क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे सुरू असलेले उदात्तीकरण ताबडतोब थांबवा. या मागणीसाठी मंगळवार ११ मार्च २०२५ रोजी चलो छत्रपती संभाजीनगर अशी हाक दिली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आंदोलन करण्यास परवानगी नाकारून हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा बंदीच्या नोटीस बजावल्या. तसेच सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुद्धा विनंती केली.
तरी क्रूरकर्मा औरंगजेबाची उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवशी सकाळी ११ वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण ताबडतोब थांबवा. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर असलेला हजरत औरंगजेब नावाचा बोर्ड तात्काळ हटवा. त्या जागी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे अशा नावाचा बोर्ड लावा.
हे ही वाचा:
भारत नेहमी प्राण्यांच्या संरक्षणात आघाडीवर
इंडियन वेल्स: ५ वेळा चॅम्पियन जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत
जीएसटी दरांमध्ये कपात करून कर प्रणाली अधिक सुकर होणार
ऑटिस गिब्सन केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक
औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ, फुल, चादर चढवून, नतमस्तक होण्यासाठी राजकीय नेत्यांना बंदी घाला. या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व संभाजीभक्तांनी शिवभक्तांनी, राष्ट्रभक्त नी उपस्थित राहावे. सदरच्या आंदोलन हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष मा. नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे, असे आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, विष्णुपंत पाटील, अविनाश मोहिते, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रसाद रिसवडे, मनोज साळुंखे, रवी वादवणे, अरुण वाघमोडे, प्रदीप निकम यांनी केले आहे.