वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज ऑटिस गिब्सन यांची कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) ने आयपीएल २०२५ साठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते रयान टेन डेशकाटे यांची जागा घेतील. जे आता भारताचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
गतविजेता केकेआरने अलीकडेच अजिंक्य रहाणे यांना नवा कर्णधार आणि वेंकटेश अय्यर यांना उपकर्णधार म्हणून घोषित केले होते. मागील वर्षी संघाचे मार्गदर्शक असलेले गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक मोर्न मॉर्कलही भारतीय संघात सामील झाले आहेत, तर केकेआरला विजेतेपद पटकावून देणारे श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्जसोबत आहेत.
हेही वाचा:
‘पंचायत सीजन 3’ बनली बेस्ट सीरीज, जितेंद्र कुमार सर्वोत्तम
जीएसटी दरांमध्ये कपात करून कर प्रणाली अधिक सुकर होणार
भारतीय संघाच्या विजयासाठी अयोध्येत हवन
दोन महिलांनी दाम्पत्यावर केला फरशीने हल्ला, गुन्हा दाखल
यापूर्वी केकेआरने ड्वेन ब्रावो यांना संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमले होते. संघाचे मुख्य प्रशिक्षक अद्याप चंद्रकांत पंडित आहेत, तर बी. अरुण, चार्ल क्रो आणि नेथन लीमॉन हे कोचिंग स्टाफचे अन्य सदस्य आहेत.
गिब्सन निवृत्तीनंतर सतत कोचिंगच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. २००७ मध्ये त्यांनी इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषवले. त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांचे मुख्य प्रशिक्षकपदही सांभाळले. नंतर ते पुन्हा इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक झाले आणि त्याच भूमिकेत बांगलादेश संघासोबतही काम पाहिले. त्यांनी विविध फ्रँचायझी लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.