28 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेषकर्नाटका : हंपी अत्याचार प्रकरणी दोघांना अटक, तिसऱ्याचा शोध सुरु!

कर्नाटका : हंपी अत्याचार प्रकरणी दोघांना अटक, तिसऱ्याचा शोध सुरु!

पोलिसांचा अधिक तपास सुरु   

Google News Follow

Related

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी (८ मार्च) कोप्पल जिल्ह्यात एका परदेशी नागरिकासह दोन महिलांवर झालेल्या “बलात्काराचा” निषेध केला आणि आश्वासन दिले की त्यांचे सरकार राज्यात येणाऱ्या पर्यटकांसह सर्वांना संरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

ही घटना गुरुवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान सानापूर तलावाजवळ घडली. हंपीपासून सुमारे ४ किमी अंतरावर ही जागा आहे. हंपी हे कर्नाटकातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असून देश- विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास, दोन महिला आणि तीन पुरुष, हे हंपी आणि जवळपासच्या इतर ठिकाणी गप्पा मारत फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले.

यावेळी मोटारसायकलवरून तीन तरुण त्यांच्याकडे आले आणि त्यांनी या गटाकडे पेट्रोल मागितले आणि सांगितले की त्यांच्याकडे पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यांना २० रुपये देऊ केले असता बाईकवरील पुरुषांनी १०० रुपये मागितले. यातून वाद झाला आणि हाणामारीही झाली. हल्लेखोरांनी पुरुष पर्यटकांना कालव्यात ढकलले. त्यानंतर, ते पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, तीनपैकी दोघांनी तिच्यावर आणि इस्रायली पर्यटकावर बलात्कार केला.

हे ही वाचा : 

सीरियन सैन्य आणि असद समर्थकांमध्ये संघर्ष, दोन दिवसात एक हजार लोकांचा मृत्यू!

राजस्थानमध्ये ४५ कुटुंबांची घरवापसी!

ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या आहूजाला अटक

भारत नेहमी प्राण्यांच्या संरक्षणात आघाडीवर

कालव्यात पडलेल्या तिघांपैकी डॅनियल आणि पंकज बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु ओडिशाचा डेबॉस बाहेर पडू शकला नाही. त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींपैकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि तिसऱ्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम ३०९ (६) (खंडणीची चोरी), ३११ (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने दरोडा), ७० (१) (सामूहिक बलात्कार) आणि १०९ (खून करण्याचा प्रयत्न) यांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
238,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा