31 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरदेश दुनियापाकिस्तान भारताशी लढू शकेल, पण फक्त चार दिवस

पाकिस्तान भारताशी लढू शकेल, पण फक्त चार दिवस

पाकिस्तानी लष्करासमोर उभे प्रश्नचिन्ह

Google News Follow

Related

पहलगाममध्ये गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला असताना, पाकिस्तानच्या लष्कराकडे आवश्यक तोफखाना दारुगोळ्याचा तीव्र तुटवडा असल्याचे समोर आले आहे.  त्यांना फक्त चार दिवसच युद्ध करता येईल, असे ANI वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

दारुगोळ्याचा हा तुटवडा मुख्यत्वे पाकिस्तानने अलीकडेच युक्रेन व इस्रायलसोबत केलेल्या शस्त्रास्त्र करारांमुळे झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या युद्ध साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक मागणी वाढल्यामुळे आणि जुनाट उत्पादन सुविधांमुळे, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीज (POF) ला साठा वाढवण्यात अडचणी येत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानी नेत्यांनी दावा केला आहे की भारत पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सैनिकी कारवाई करेल आणि ते भारतीय आक्रमणास तडाखेबंद उत्तर देतील. मात्र, वास्तव वेगळं आहे. कमी होणाऱ्या साठ्यामुळे पाकिस्तानकडे उच्च तीव्रतेच्या संघर्षासाठी फक्त ९६ तासांचा (चार दिवसांचा) दारुगोळा शिल्लक आहे, ज्यामुळे लष्कर असुरक्षित स्थितीत आहे, असेही सांगण्यात आले.

हे ही वाचा:

इथे पाकिस्तान घामाघूम, तिथे बलुच लिबरेशन आर्मीने फेस आणला…

पंजाब: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक!

‘जम्मू-काश्मीर हल्ल्याचा बदला घेईपर्यंत पुष्पगुच्छ नको!’

पौड नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना, चांद शेखला अटक

पाकिस्तानची लष्करी नीती भारताच्या संख्यात्मक श्रेष्ठतेला रोखण्यासाठी जलद तैनातीवर आधारित आहे. मात्र, भारतीय लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेश्या १५५ मिमी शेल्स (M109 होवित्झर्ससाठी) किंवा १२२ मिमी रॉकेट्स (BM-21 सिस्टीमसाठी) नाहीत.

एप्रिलमध्ये X वरील अनेक पोस्ट्समध्ये दावा करण्यात आला की १५५ मिमी तोफगोळे युक्रेनला देण्यात आले, ज्यामुळे साठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वामध्ये या परिस्थितीमुळे मोठी चिंता आणि घबराट आहे. हा विषय २ मे रोजी झालेल्या स्पेशल कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्समध्ये चर्चिला गेला.

गुप्तचर अहवालांनुसार, पाकिस्तानने संभाव्य भारतीय हल्ल्याच्या तयारीसाठी भारत-पाकिस्तान सीमेजवळ दारुगोळा गोदामांची उभारणी केली आहे. याआधी माजी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांनी स्वतः मान्य केले होते की पाकिस्तानकडे पुरेसा दारुगोळा आणि आर्थिक ताकद नाही, जेणेकरून भारताशी दीर्घकालीन संघर्ष करता येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा