29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात आणि आव्हान संपले भारताचे

पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात आणि आव्हान संपले भारताचे

गतविजेत्या भारताची शेवटची आशाही मावळली

Google News Follow

Related

गतविजेत्या भारताचे आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील आव्हान अखेर संपुष्टात आले. पाकिस्तानने सुपर फोरमध्ये अफगाणिस्तानवर एक विकेटनी मात केली आणि भारताच्या अपेक्षांवर पडदा पडला. अफगाणिस्तानचेही स्पर्धेतील आव्हान या पराभवामुळे संपुष्टात आले. आता श्रीलंका आणि पाकिस्तान हे अंतिम फेरीत आमनेसामने असतील.

पाकिस्तानकडून सुपर फोरमध्ये पराभूत झाल्यामुळे आणि नंतर श्रीलंकेनेही भारताला पराभूत केल्यामुळे भारताची संधी जवळपास संपुष्टात आली होती. मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तान लढतीवर थोड्या आशा जिवंत होत्या. मात्र बुधवारी पाकिस्तानने एक विकेटने अफगाणिस्तानला नमविल्यावर मात्र भारताचे आव्हान संपुष्टात आले.

अफगाणिस्तानला पाकिस्तानने ६ बाद १२९ धावांवर रोखले होते. ही कमी धावसंख्या समोर असतानाही अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांची कोंडी केली. त्यामुळे ३ बाद ५२ अशा स्थितीत पाकिस्तानी संघ सापडला होता. शादाब खानला पाचव्या क्रमांकावर पाठविल्यामुळे पाकिस्तानचा डाव सावरला. पण अफगाणिस्तानचा गोलंदाज फाझलहक फारुखीने पाकिस्तानला सलग दोन दणके दिल्यानंतर मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी संघ अडचणीत सापडला. शेवटच्या दोन षटकात पाकिस्तानला २१ धावांची गरज होती. फरीद अहमदने हारिस रौफ आणि आसिफ अली यांना माघारी धाडल्यामुळे एक विकेट शिल्लक असताना पाकिस्तानला अखेरच्या षटकांत ११ धावांची गरज होती. या षटकात फारुखीने दोन यॉर्कर टाकले पण ते नसीम शाहने फुलटॉस घेत सीमापार पाठवले आणि पाकिस्तानने रोमहर्षक विजय मिळविला.

हे ही वाचा:

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले

जपानमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

‘राहुुल गांधी यांनी अखंड भारत यात्रा काढावी तिही पाकिस्तानातून’

 

त्याआधी, पाकिस्तानने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला २० षटकांत ६ बाद १२९ धावसंख्येवर रोखले. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरानने केलेली ३५ धावांची खेळी ही त्यांची सर्वोच्च खेळी ठरली. पाकिस्तानच्या हारिस रौफने २ बळी घेतले.

शादाब खान हा सामन्यात सर्वोत्तम ठरला. त्याने ३६ धावांची खेळी केलीच शिवाय एक बळीही मिळविला. आता ११ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ विजेतेपदासाठी झुंजतील. त्याआधी, सुपर फोरमधील त्यांची लढत शिल्लक आहे. त्यातही त्यांना एकमेकांना आजमावता येईल. ही लढत ९ सप्टेंबरला होत आहे.

स्कोअरबोर्ड

अफगाणिस्तान ६ बाद १२९ (इब्राहिम झदरान ३५, हजरतुल्ला झझाई २१, हारिस रौफ २६-२) पराभूत वि. पाकिस्तान ९ बाद १३१ (शादाब खान ३६, इफ्तिकार अहमद ३०, मोहम्मद रिझवान २०)

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा