33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाफायझरची लस भारतात 'ना नफा' तत्वावर मिळणार

फायझरची लस भारतात ‘ना नफा’ तत्वावर मिळणार

Google News Follow

Related

भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने ‘ना नफा’ या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली आहे. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

भारत सरकारने सुरू केलेल्या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी फायझर कंपनी ‘ना नफा’ या किंमतीमध्ये लस देण्यास तयार आहे. त्या संबंधी आम्ही भारत सरकारच्या सातत्याने संपर्कात असून आमची चर्चा सुरू आहे असं फायझर कंपनीचे प्रवक्त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं आहे. अमेरिकन कंपनी फायझरने स्पष्ट केलं आहे की सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी कंपनीचे काही वेगळी धोरणं असून त्याच्या आधारे ना-नफा किंमतीमध्ये काही देशांना कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

मृतदेह चुकीच्या घरी पाठवला, बीकेसी कोविड सेंटरचा धक्कादायक प्रकार

२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु

मृतदेह दोन दिवस पडून, वाशीम मधील धक्कादायक घटना

राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र

विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या कोरोना लसींच्या किंमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील कोरोना लसीकरणामध्ये कंपनीचा हातभार लागेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीच्या एका डोसची किंमत ही १९.५ डॉलर इतकी आहे. तर युरोपमध्ये कंपनीने आपल्या लसीच्या किंमतीत वाढ केली आहे. सुरुवातीला १२ युरोमध्ये उपलब्ध होणारी ही लसीची किंमत नंतर १५.५ इतकी करण्यात आली आणि त्यात आता पुन्हा वाढ करून २०२२-२३ सालच्या ऍडव्हान्स ऑर्डर्ससाठी ती १९.५ युरो इतकी करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा