36 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरदेश दुनिया‘गाझाचा बदला’ घेण्यासाठी विमान पाडण्याचा कट

‘गाझाचा बदला’ घेण्यासाठी विमान पाडण्याचा कट

फ्लायदुबई सहवैमानिकाची कबुली

Google News Follow

Related

फ्लायदुबईच्या FZ-1073 विमानावरील हल्ल्याच्या तपासात गंभीर माहिती समोर आली आहे. ओमानी सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने ‘गाझाचा बदला घेण्यासाठी’ हा हल्ला केल्याचे चौकशीदरम्यान सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर, फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीच त्याने तेल अवीवला जाणाऱ्या विमानावर हल्ला करण्याची योजना आखली होती आणि बेन गुरियन विमानतळावर विमान आदळवण्याचा विचार केला होता, अशी माहितीही तपासाशी संबंधित इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर आली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी इस्रायलची अंतर्गत सुरक्षा संस्था शिन बेटचे अधिकारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाले आहेत. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, शिन बेटचे अधिकारी अल-हमामीची चौकशी करणाऱ्या यूएईच्या तपास यंत्रणांमध्ये सहभागी झाले आहेत. त्याने विमान बेन गुरियन विमानतळावर आदळवण्याची योजना आखली होती, अशी माहिती त्याने चौकशीदरम्यान दिल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हम्माम अल-हम्मामी याने ‘गाझाचा बदला घेण्यासाठी’ हे कृत्य केल्याचे चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच आपल्याला ‘शहीद म्हणून मरायचे होते’, असेही त्याने म्हटल्याचे वृत्त आहे. त्याने हा कट स्वतःहून आखला होता की त्यामागे एखादी संघटना किंवा इतर कोणाचा सहभाग होता, याचा तपास अद्याप सुरू आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने तेल अवीवला जाणाऱ्या विमान कंपन्यांची माहिती घेतली होती आणि त्यानंतर फ्लायदुबईमध्ये वैमानिक म्हणून अर्ज केला. त्याने यापूर्वी तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातून प्रवास केला होता आणि त्यावेळीही विमानाचे अपहरण करून ते लक्ष्यावर आदळवण्याचा विचार केला होता, मात्र तो प्रयत्न त्याने केला नाही, असे वृत्त आहे.

हे ही वाचा:

फ्लायदुबईचे ‘ते’ विमान पाडण्यास इस्रायल होता सज्ज

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

भारतीय बॉक्सिंगची वाटचाल ४४व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर!

आताच्या प्रयत्नात कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित माछर यांनी प्रतिकार केल्याने हम्माम अल-हम्मामीची ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. कॅप्टनवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवासी आणि विमानातील इतर वैमानिकांनी हस्तक्षेप करून हम्माम अल-हम्मामीला रोखले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा