26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरदेश दुनियाराष्ट्रकुल स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंचा विश्वास पंतप्रधानांनी वाढविला!

राष्ट्रकुल स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंचा विश्वास पंतप्रधानांनी वाढविला!

Related

बर्मिंगहॅम इंग्लंड येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खेळामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोबल वाढवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्व खेळाडूंशी संवाद साधला. कोणत्याही दबावाशिवाय पूर्ण ताकदीने खेळण्याचा मंत्र त्यांनी दिला आहे. पंतप्रधान म्हणाले की, खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला उत्तम ठसा उमटवतील.

पंतप्रधान मोदी ह्यांचे खेळाडूंना नवा संदेश. . . .

२० जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ते म्हणाले की, आज खेळाडूंचा उत्साह ही उंचावलेला आहे, प्रशिक्षणही चांगले झाले आहे आणि देशातील खेळाचे वातावरणही चांगले झाले आहे. खेळाडू आज नवीन उंची गाठत आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आजचा दिवस जगासाठी महत्वाचा आहे. फक्त मैदाने बदलले आहेत, तुमचा उत्साह, तुमची जिद्द तीच राहुद्यात… तिरंगा फडकवणे आणि राष्ट्रगीत ऐकणे हे ध्येय समजून खेळा. कोणत्याच दबावाखाली खेळू नका, तिथे उत्तम प्रकारे आपली छाप पाडा… १० ते १५ दिवसात आपले कौशल्य दाखवून वर्चस्व गाजवण्याची सुवर्णसंधी आहे.

बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल खेळ सुरू होण्याच्या दिवशी २८ जुलै रोजी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होईल. असाही उल्लेख केला. पहिल्यांदाच मोठ्या आंतराष्ट्रीय मैदानावर येणाऱ्या खेळाडूंचे अशा प्रकारे मनोबल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवले. पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितले की, तुम्ही केवळ खेळावरच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावर नव्या भारताचे प्रतिनिधित्व करत आहात. तुमच्यासारखे खेळाडू हे सिद्ध करत आहेत की भारताचा प्रत्येक कानाकोपरा क्रीडा क्षेत्राने भरलेला आहे. प्रेरणेसाठी तुम्हाला बाहेर पाहण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याच खेळाडू मित्र मैत्रिणींना पाहिलत की, एक चैतन्य तुम्हाला प्राप्त होईल.

हे ही वाचा:

पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येची तिसरी घटना!

“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”

‘सर्वोच्च’ निर्णय; ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश

मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

 

पंतप्रधान मोदींच म्हणणे आहे की,तुम्ही खेळ जिद्दीने खेळा, पूर्ण ताकदीने खेळा आणि कोणत्याही तणावाशिवाय खेळा. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभवही जाणून घेतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा