32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर देश दुनिया ४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

Related

जागतीक स्तरावर अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जी-७ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ आणि १३ जून रोजी जी-७ शिखर परिषदेत सहभागाची होणार आहेत. सध्या इंग्लंड जी-७ परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहे. तर भारतासह,ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

आगामी जी-७ परिषदेच्या आऊटरिच सेशन्स म्हणजेच जनसंपर्क सत्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आभासी स्वरूपात सहभागी होणार आहेत. ही बैठक मिश्र स्वरूपात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी दुसऱ्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या आधी २०१९ साली फ्रांसच्या अध्यक्षांनीही भारताला आमंत्रित केले होते. या वेळी पंतप्रधान मोदी ‘सदिच्छा भागीदार’ म्हणून ‘हवामान, जैव-विविधता आणि महासागर’ आणि ’डिजिटल परिवर्तन’ अशा दोन सत्रांमध्ये सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लस घेतली का?

…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा उच्छाद…ग्रंथालयात घुसखोरी, गार्डलाही मारहाण

या वर्षीच्या जी-७ शिखर परिषदेची संकल्पना ‘बिल्ड बॅक बेटर” म्हणजेच ‘उत्तम पद्धतीने पुन्हा उभारणी’ अशी आहे. ब्रिटनने आपल्या अध्यक्षपदासाठी चार प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. ही चार क्षेत्रे म्हणजे, कोरोनाविषाणूपासून संपूर्ण जगाला मुक्त करतानांच भविष्यातील महामारीशी लढा देण्यासाठी अधिक ताकद निर्माण करणे; मुक्त आणि वाजवी व्यापाराला प्रोत्साहन देत, सर्वांचे भविष्य अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न; हवामान बदलाच्या समस्येची हाताळणी आणि पृथ्वीची जैवविविधता जपणे, आणि चौथे, सामाईक मूल्ये आणि मुक्त समाजाच्या उभारणासाठी प्रयत्न करणे. या परिषदेत,सर्व जागतिक नेते, महामारीपासून जगाला मुक्त करण्यासाठी आपापले विचार मांडणार आहेत, यात आरोग्य आणि हवामान बदल या मुद्द्यांवर विशेष भर असेल.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा