32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर क्राईमनामा जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा उच्छाद...ग्रंथालयात घुसखोरी, गार्डलाही मारहाण

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा उच्छाद…ग्रंथालयात घुसखोरी, गार्डलाही मारहाण

Related

दिल्लीतील प्रसिद्ध असलेली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी पुन्हा एकदा चुकीच्या कारणांनी चर्चेत आली आहे. मंगळवार, ८ जून रोजी जेएनयूमधल्या काही विद्यार्थ्यांनी कोविड नियमावली धाब्यावर बसवून विद्यापीठात उच्छाद मांडल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठातील ग्रंथालयात जबरदस्ती घुसून तिथे उपस्थित सुरक्षारक्षकाला या विद्यार्थ्यांना मारहाण केली. याविषयी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली असून या विद्यार्थ्याने विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिल्लीत सुरु असलेला कोरुना प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयूमधील केंद्रीय ग्रंथालय हे बंद ठेवण्यात आले आहे. गेली अनेक दिवस हे ग्रंथालय उघडण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. पण विद्यापीठ प्रशासन कोरोना नियमावलीच्या कारणास्तव ग्रंथालय उघडत नव्हते. अखेर मंगळवारी सकाळी अंदाजे १० वाजून ४० मिनिटांनी ३५ ते ४० विद्यार्थ्यांचा एक समूह ग्रंथालयाबाहेर एकत्र जमला. त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला ग्रंथालयाचे दार उघडण्यास सांगितले. पण सुरक्षारक्षकाने दार उघडण्यास नकार दिला. यावरून सुरक्षारक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यात विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केली.

हे ही वाचा:

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लस घेतली का?

…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

तुमच्या खांद्यावर निष्पाप प्रेतांचे ओझे वाढतेय… जरा चाड बाळगा

ग्रंथालय बाहेरील सुरक्षा रक्षकाने आपल्या मदतीसाठी आवारातील इतर सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना बोलावले. या साऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ग्रंथालयाच्या एका छोट्या दरवाजाच्या काचा फोडत विद्यार्थी ग्रंथालयात घुसले. यावेळी या विद्यार्थ्यांनी कोविडचे सारे नियम पायदळी तुडवले. घुसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींच्या तोंडावर मास्कही नव्हता.

काही माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग
न्यूज डंकाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रंथालयात घुसलेल्यांपैकी बहुतेक जण हे यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. यातील काहीजण हे जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. पण हे विद्यार्थी आजही जेएनयू हॉस्टेलमध्येच राहत आहेत. कारण महाविद्यालय प्रशासनाकडून अजूनही त्यांना हॉस्टेलची खोली खाली करण्यास सांगण्यात आलेले नाही.

या सर्व प्रकाराबद्दल जेएनयूमधील सुरक्षारक्षकांनी पोलीस तक्रार केली असून त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी महामारी कायद्यची कलमे लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा