27.1 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरदेश दुनियाआंदोलकांची आरएएफ जवानाला मारहाण, वाहनांची तोडफोड

आंदोलकांची आरएएफ जवानाला मारहाण, वाहनांची तोडफोड

दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला

Google News Follow

Related

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटना सर्व माध्यमांनी दाखवल्या. मात्र आंदोलकांच्या एका गटाने सुरक्षा दलांवर हल्ला केल्याच्याही अनेक घटना घडल्य़ा आहेत. जंतर-मंतरजवळ मंगळवारी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान, काही आंदोलकांनी जोरदार गोंधळ घातला.

यादरम्यान, जमावाने आरएएफच्या एका जवानाला पकडून त्याला बेदम मारहाण केली. जमावाने घेराव घालून केलेल्या मारहाणीमुळे या जवानाचे प्राण संकटात सापडले असताना तिथे उपस्थित असलेल्या आएएफच्या इतर जवानांनी प्रसंगावधान राखत या जवानाला जमावाच्या तावडीतून सोडवले. तसेच या प्रकरणी कठोर भूमिका घेत दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशीस सुरुवात करून आतापर्यंत एकूण १० एफआयआर नोंदवल्या आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जमावाने आरएएफच्या एका जवानाला घेरल्याने कनॉट प्लेस येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र सहकारी जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने या जवानाचे प्राण वाचले. त्यानंतर पीडित जवानाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले आहेत.

हे ही वाचा:

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके बंद

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींशी भेट

राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांचा निर्लज्ज राजकीय वापर!

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोसल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्याचे आणि तिथे उभ्या असलेल्या आरएएफच्या गाड्यांची तोडफोड केल्याचे दिसत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सर्वसामान्य जनता आणि आंदोलकांना शांतता कायम ठेवण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे. वारंवार इशारा देऊनही आंदोलकांकडून कलम १४४ चं उल्लंघन होत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या पथकांकडून या घटनेशी संबंधित २५० हून अधिक व्हिडीओ तपासले जात आहेत. या व्हिडीओमधील फुटेजच्या आधारावर आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांची ओळख पटवली जात आहे. तसेच कायदा हातात घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा