नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर आंदोलक आक्रमक झाले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही लोकसभा कामकाजाविना स्थगित करावी लागली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा विरोधकांनी इशारा दिला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. पण, आधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमीका विरोधकांनी घेतली. त्यामुळे सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला. लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे तिन वेळा लोकसभेचे कामकाज तबकूब करण्यात आले. शेवटी हा गदारोळ कमी झालाच नाही म्हणून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
लोकसभेसोबत राज्यसभेतही विरोधकांच्या आक्रमक भूमीकेला सरकारला सामोरे जावे लागले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस आणि विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. यावर संसंदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चेसाठी तयार आहे. जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळी आम्ही चर्चा करू. त्याला उत्तर ही देण्याची सरकारची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस खासदार के.सी. वेणूगोपाल यांनी आम्ही ही चर्चेला तयार आहे. पण त्या आधी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा. आधी राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमीका काँग्रेसने घेतले. त्यानंतर घोषणाबाजी वाढतच गेली.
या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा ज्यावेळी कामकाज सुरू झाले त्यावेळी ही विरोधक आक्रमक होते. यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. हा मुद्दा काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भाजपचा नाही. तर हा मुद्या युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. आम्हाला बोलू का दिलं जात नाही? तुम्ही योग्य भूमीका घेत नाही असा थेट आरोप त्यांनी अध्यक्षांवर केला. आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. विद्यार्थी रस्त्यावर उतरणारच. त्यांच्यासोबत जे झालं ते भयंकर होतं. कोणाचे हात तोडले. कोणाचे पाय तोडले. मुलींचे कपडे फाडले. तुम्ही आई बहीणींचे कपडे फाडणार आहात का? तुम्हाला याची परवानगी कुणी दिली? अशा शब्दात त्यांनी सरकारला प्रश्न केले.
हे ही वाचा:
आंदोलकांची आरएएफ जवानाला मारहाण, वाहनांची तोडफोड
अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद
आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके बंद
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान मोदींशी भेट
आमचा नाईलाज झाला म्हणून आम्ही पंतप्रधानांच्या निसासस्थानाबाहेर गेलो. लोकसभेत तुम्ही आमचं ऐकलं नाही. पंतप्रधान बाहेर बोलतात. मग त्यांना लोकसभेत बोलायला काय झालं? ते का बोलले नाहीत. असा प्रश्न ही त्यांनी सरकारला केला. यामुळे पुन्हा एकदा लोकसभेत गदारोळ झाला. शेवटी अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले. मात्र दोन वाजताही तिच स्थिती होती. विरोधकांनी राजीनाम्याचा प्रश्न लावून धरला होता. यामुळे गदारोळ वाढतच गेला. शेवटी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेत ही जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी ही राज्यसभेत आधी राजीनामा नंतर चर्चा अशी भूमीका घेतली होती.







