30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरक्राईमनामासाहिल आत्महत्या प्रकरणी भडकावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

साहिल आत्महत्या प्रकरणी भडकावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

आयआयटी मुंबईतील बी.टेक. विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वकील नवनीत, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया अर्थात ओसीआय कार्डधारक जर्मन नागरिक आणि ज्येष्ठ वकील मिहिर देसाई, आयआयटी मुंबईच्या मानविकी विभागातील प्राध्यापक सूर्यकांत वाघमोरे, तसेच विद्यार्थी हुमा नामल, अमरकांत ठाकूर आणि इतरांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

ही तक्रार बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) आणि महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्यातील संबंधित कलमांनुसार करण्यात आल्याचे लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी अर्थात एलआरओने म्हटले आहे. एलआरओच्या माहितीनुसार, ही तक्रार जातीय दंगली भडकवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या समाजमाध्यमांवरील पोस्ट करणे, सामाजिक अशांतता निर्माण करणे आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा कट रचणे या आरोपांशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

साहिलचा शेवटचा मेसेज…माझ्याकडून चूक झाली!

अंकुश पंघलची उपांत्यपूर्व फेरीत धडक

‘निवडणूक आयोगातील ‘मतभेद’ हे निर्णयप्रक्रियेचाच भाग’

ट्रम्प यांचा भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉरला पाठिंबा

तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांनुसार, मिहिर देसाई हे एचआरएलएन-एसएलआयसी या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहेत. ही संस्था जर्मन कॅथोलिक चर्चशी संबंधित मिसेरिऑर या स्वयंसेवी संस्थेकडून निधी मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, या संस्थेने २०२०च्या दिल्ली दंगलीतील आरोपींना कायदेशीर मदत दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या दंगलीदरम्यान गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एलआरओने असा दावाही केला आहे की, नवनीत या मिहिर देसाई यांच्या चेंबरमध्ये काम करतात. साहिल वाकोडेचे आई-वडील आणि नातेवाईक रुग्णालयात उपस्थित असताना नवनीत तेथे गेल्या होत्या आणि त्यांनी साहिलच्या कुटुंबीयांना प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्याविरोधात अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा