29 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरदेश दुनियाट्रम्पपुढे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाळघोटेपणाची कमाल

ट्रम्पपुढे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाळघोटेपणाची कमाल

म्हटले आशियाचे तारणहार

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीच्या पुनर्बांधणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’ची पहिली बैठक गुरुवारी झाली. वॉशिंग्टन डीसी येथील डोनाल्ड जे. ट्रम्प इन्स्टिट्यूट ऑफ पीस येथे आयोजित या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील सहभागी झाले होते. या बैठकीतही  शरीफ यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढे लाळघोटेपणा केला.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी गाझा पट्टीच्या पुनर्बांधणीवरील या बैठकीचा वापर ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यासाठी केला. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दक्षिण आशियाचे तारणहार संबोधले आणि “आपल्यासारखा कोणी नाही” असेही म्हटले. ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’च्या पहिल्या बैठकीत शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प हे शांतिदूत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने ट्रम्प हे दक्षिण आशियाचे रक्षक असून दक्षिण आशियाचा उद्धार करणारे आहेत. भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी ट्रम्प यांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि युद्ध थांबवण्याबाबत केलेल्या दाव्यांनाही समर्थन दिले. त्यांनी सांगितले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या प्रदेशात शांततेसाठी काम केले होते.

हे ही वाचा:

भारत- पाकिस्तान सीमेवर लटकवल्यात काचेच्या बाटल्या! काय आहे कारण?

ट्रम्प यांचा ओबामांवर आरोप

कांगारू उडाले, लंका जळाली… झिम्बाब्वेचा धिंगाणा सुरुच!

हैदराबादमधील रेस्टॉरंट्सवर आयकर विभागाची धडक कारवाई

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या विधानानंतर भारताशी संबंधित युद्धविरामाबाबत ट्रम्प यांच्या दाव्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये पाकिस्तानसह २७ देश सहभागी आहेत. अर्जेंटिना, अझरबैजान, सौदी अरेबिया, यूएई आणि इस्रायलही या बोर्डमध्ये आहेत; मात्र पॅलेस्टाईन याचा भाग नाही.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यात सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले होते. बोर्डच्या पहिल्या बैठकीत भारत निरीक्षक म्हणून सहभागी झाला. भारताच्या वतीने वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाच्या ‘चार्ज डी अफेयर्स’ नमग्या खम्पा यांनी प्रतिनिधित्व केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा