32 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरदेश दुनिया... म्हणून जर्मन एअरलाइन ‘लुफ्थांसा’कडून ऑक्टोबरपर्यंत २०,००० उड्डाणे रद्द

… म्हणून जर्मन एअरलाइन ‘लुफ्थांसा’कडून ऑक्टोबरपर्यंत २०,००० उड्डाणे रद्द

उन्हाळी ऑपरेशन्सवर होणार परिणाम

Google News Follow

Related

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा आणि तेलाच्या किमतींवरील वाढत्या दबावाचा परिणाम आता युरोपवर दिसू लागला आहे. जर्मनीची प्रमुख एअरलाइन लुफ्थांसा ने वाढत्या जेट फ्यूलच्या किमतीमुळे ऑक्टोबरपर्यंत सुमारे २०,००० उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या उन्हाळी ऑपरेशन्सवर परिणाम होणार असून एकूण क्षमतेत सुमारे १ टक्क्यांची घट अपेक्षित आहे.

एअरलाइनच्या माहितीनुसार, अलीकडील भू-राजकीय तणाव, विशेषतः अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण संघर्षानंतर जेट फ्यूलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खर्च कमी करण्याच्या उद्देशाने उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पावलामुळे सुमारे ४०,००० मेट्रिक टन जेट फ्यूलची बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

लुफ्थांसा ग्रुपने स्पष्ट केले आहे की, बहुतेक कपात ही लहान अंतराच्या उड्डाणांमध्ये केली जाणार आहे, विशेषतः ज्या मार्गांवर नफा कमी होत होता. याशिवाय कंपनी आपल्या युरोपीय नेटवर्कचे पुनर्गठन करत असून त्यात फ्रँकफुर्ट, म्युनिक, झ्युरिख, व्हिएन्ना, ब्रुसेल्स आणि रोम यांसारख्या प्रमुख गंतव्यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, लुफ्थांसा चा हा निर्णय जागतिक विमानवाहतूक क्षेत्रातील व्यापक ट्रेंडचा भाग आहे. KLM, Air Canada, Singapore Airlines आणि United Airlines यांसारख्या इतर मोठ्या एअरलाइन कंपन्यांनीही वाढत्या इंधन खर्चामुळे त्यांच्या उन्हाळी उड्डाणांमध्ये कपात केली आहे.

हे ही वाचा:

रात्री बाइक चालवण्यास बंदी आणि ९६ तासांचा ड्राय डे लागू

राज्यात उष्णतेचा कहर; सात जण दगावले

ट्रम्प यांचा यू-टर्न; इराणसोबतचा शस्त्रसंधी करार वाढवला

“भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!”

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुज सामुद्रधुनीतून तेलपुरवठा खंडित होण्याच्या भीतीमुळे जेट फ्यूलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या जागतिक अनिश्चिततेमुळे एअरलाइन कंपन्यांना खर्च नियंत्रणासाठी असे निर्णय घ्यावे लागत आहेत. याचा परिणाम प्रवाशांवरही होणार असून उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा