28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरदेश दुनियापुरात सापडलेल्या केनियाला भारताने पुन्हा दिला मदतीचा हात!

पुरात सापडलेल्या केनियाला भारताने पुन्हा दिला मदतीचा हात!

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

केनियामध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या महिन्यात दुसऱ्यांदा मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे.केनियाला भारताने दिलेल्या मदतीमध्ये ४० टन अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.गाझियाबादमधील हिंडन विमानतळावरून भारतीय हवाई दलाच्या विमानातून मंगळवारी ही मदत केनियापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ट्विटकरून याची माहिती दिली.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ट्विट करत लिहिले की, “पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ४० टन औषधे, वैद्यकीय पुरवठा आणि इतर उपकरणे असलेली आपत्ती निवारण सामग्रीची (एचएडीआर ) दुसरी खेप केनियाला रवाना झाली आहे.ऐतिहासिक भागीदारीसाठी उभे राहणे, विश्वबंधू एक जगासाठी, असे मंत्री एस.जयशंकर यांनी लिहिले.

हे ही वाचा:

नांदेडच्या छापेमारीत ८ किलो सोनं, १४ कोटींची रोकड अशी १७० कोटींची मालमत्ता जप्त!

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

बंगलादेशची पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल!

राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!

दरम्यान, यापूर्वी १० मे रोजी भारताने आफ्रिकन राष्ट्र केनियाला अन्न पुरवठा आणि वैद्यकीय मदत पाठविली होती.केनियामधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.केनियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.तसेच या दुर्घटनेत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.हजारो लोक विस्थापित झाले असून जवळपास २,००० शाळा नष्ट झाल्याची माहिती आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा