30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरदेश दुनियाकोरोनावरील आयुर्वेदिक औषधी आयुरकोरो-३ च्या क्लिनिकल ट्रायल ठरल्या यशस्वी

कोरोनावरील आयुर्वेदिक औषधी आयुरकोरो-३ च्या क्लिनिकल ट्रायल ठरल्या यशस्वी

Related

आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून कोरोनावर केवळ अर्ध्या दिवसात रोगमुक्त करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला असून त्यासंदर्भातील आयुरकोरो-३ या औषधाच्या क्लिनिक्ल ट्रायल यशस्वी ठरल्या आहेत. याबाबतचे शोध प्रबंध तयार करण्यात आले असून त्यांना मान्यताही मिळाली आहे. लवकरच ही औषध सर्वसामान्यांसाठी वेबसाइट द्वारे ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

यासंदर्भात श्री सर्वेश्वर सेवा सहकार संस्थेचे संचालक उमेश गायकवाड यांनी सांगितले की, आयुर्वेदिक पंचगव्य चिकित्सेच्या माध्यमातून डॉ. जाधव आणि डॉ. देशमुख यांच्या सल्ल्याने कुर्ला,धारावीला हजारो लोकांना आम्ही औषधे दिली. तेव्हा असे आढळले की, अर्ध्या दिवसाच्या डोसनेही कोरोना नियंत्रणात येत आहे. धारावी व कुर्ल्यातील पोलिसांमध्येही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला होता. त्यावेळी पोलिसांनीही ही औषधे घेतली. त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि अनेकजण कोरोनामुक्त झाले. पण या औषधांचे क्लिनिकल ट्रायल घेणे आवश्यक होते. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलअंतर्गतच ते केले. त्यात यश आले.

गायकवाड म्हणाले की, भक्ती वेदांतने आयसीएमआरच्या नियमावलीनुसार क्लिनिकल ट्रायल घेतल्या आणि त्या यशस्वी झाल्या. सोबतच पालघर जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटल मध्येही फ्रंट लाइन वर्कर असलेल्या डॉक्टर, नर्स, वार्डबॉय इत्यादि कोविड 19 रुग्णावर कार्यरत मंडळीना प्रतिबंधात्मक औषधे देवून ५ महीने निरीक्षण केले असता एकही कर्मचारी पॉझिटिव्ह आला नाही,  हे खूप मोठे यश म्हणावे लागेल. सर्वसाधारण आयुर्वेदिक औषधी विक्री करीता एफडीआयची परवानगी मिळविणे आवश्यक होते. त्या सर्व औषधी घटकांची परवानगी मिळवली गेली, त्यानंतर आम्ही ICMR च्या सुचनेनुसार ‘आयुष’शी संपर्क साधला. कारण ही आयुर्वेदिक औषधी असल्यामुळे त्याचा संबंध आयुषशी असतो.

गायकवाड यांनी सांगितले की, यासंदर्भातील रिसर्च पेपर प्रकाशित करावे लागतात. असे तीन पेपर आम्ही प्रकाशित केले. ज्या शोध प्रबंध प्रकाशन संस्थाना डब्ल्यूएचओची मान्यता आहे, अशाच जागी रिसर्च पेपर प्रकाशित केले गेले. डब्ल्यूएचओ वेगळ्या प्रकारे औषधे मान्य करत नाही. तुम्ही केलेल्या संशोधनाचे पेपर्स मासिकांमध्ये प्रकाशित करावे लागतात ज्यास १३ डॉक्टरांचे पॅनेल ते तपासते. आमचा रिसर्च प्रकाशित झाल्यामुळे आम्ही आता पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ शकतो. ही औषधे आम्ही वेबसाईटच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सव्वालाख लोकांना वितरित केली.

या औषधांविषयी गायकवाड सांगतात की, हे औषध म्हणजे विशिष्ट प्रक्रिया केलेल गोमुत्र अर्क, तुरटी खडीसारखेची पूड आहे ज्यावर विशिष्ट पद्धतीने औषधी प्रक्रिया केलेली आहे. या औषधांच्या सेवनामुळे तीन डोसमध्ये कोरोना पूर्ण बरा होवून आरटीपीसीआर रिपोर्ट नेगेटिव आल्याच सप्रमाण सिद्ध झाल आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला?

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा

संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!

दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस

 

गोमुत्रात धन्वंतरी आहे असे म्हटले गेले आहे. जर ते योग्य प्रकारे रुग्णाला दिले गेले तर ते फारच उपयुक्त ठरते. आयुर्वेदाचार्य डॉ. मेमाणे, भक्तीवेदांतचे संचालक एमडी डॉ. अजय संख्ये, जसलोक, कोकिलाबेनचे सारख्या हॉस्पिटल च्या रिसर्चचे प्रमुख राहिलेले डॉ विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे होत आहे. सर्वेश्वर सेवा सहकार संस्थेच्या माध्यमातून औषधे आणण्याचं, मिळविण्याचं, वितरण करण्याच कार्य केले जाते. ही औषधे ऍलोपथीला पूरक आहेत. त्यामुळे adjuvant therapy असे त्यास संबोधले गेले आहे. पॅथी वादात न पडता लोकसेवा ध्येय ठेवून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा उद्देश आहे. लसी घेतल्यानंतरही जर कोरोना झाला तरी या औषधांमुळे लक्षणे नाहिशी होतात. रिपोर्ट नेगेटिव होण्यास मद्त मिळते हा प्रत्यक्ष अनुभव आहे, असेही गायकवाड म्हणाले.

www.ayurcoro3.com या वेबसाइट वर ही औषध उपलब्ध करून दिली जात आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा