33 C
Mumbai
Friday, May 1, 2026
घरदेश दुनियापाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावर आत्मघाती हल्ला

स्फोटात पाच जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू भागात आत्मघाती हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार, ३ एप्रिल रोजी बन्नू येथील डोमेल पोलीस ठाण्यावर सुसाइड कार बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून, एका पोलीस कर्मचाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. जिल्हा आपत्कालीन अधिकारी बख्तुल्लाह वजीर यांनी याची पुष्टी केली.

‘डॉन’च्या वृत्तानुसार, मृतांमध्ये एका कुटुंबातील पती, पत्नी, मुलगी आणि मुलगा यांचा समावेश आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस धडकली आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर गोळीबारही सुरू झाला. प्राथमिक अहवालानुसार, हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज मैलोनमैल दूरपर्यंत ऐकू गेला. या स्फोटात पोलीस ठाण्याची संतरी पोस्ट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर इमारतीचा मोठा भाग मलब्यात जमा झाला.

या स्फोटामुळे आसपासच्या निवासी भागांनाही मोठे नुकसान झाले. अनेक घरे कोसळली असून काही लोक मलब्याखाली अडकले. ‘रेस्क्यू ११२२’च्या माहितीनुसार, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा आपत्कालीन अधिकारी बख्तुल्लाह वजीर यांनी सांगितले की, स्फोटानंतर शोध आणि बचावकार्य सुरू आहे आणि परिसर पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहील.

हे ही वाचा:

अमेरिकन F-35 लढाऊ विमान पाडले?

अमेरिकेचे नवीन टॅरिफ धोरण: औषधांवर १००% कर, धातूंना दिलासा

‘हमारा बजाज’ मागील आवाज हरपला! गायक विनय मांडके यांचे निधन

“माझ्या मौनाला पराभव समजू नका…” उपनेतेपदावरील हकालपट्टीनंतर राघव चड्ढा काय म्हणाले?

दरम्यान, यापूर्वी गुरुवारी बन्नूतील घोरा गावातही एक मोठा स्फोट झाला होता, ज्यात एक सरकारी शाळा उद्ध्वस्त झाली. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, बाका खेळ परिसरातील नूर जान बाका खेळ प्राथमिक शाळेत स्फोटक लावून इमारत उडवण्यात आली. या स्फोटामुळे शाळेची इमारत पूर्णपणे कोसळली. पोलीस सूत्रांच्या मते, दहशतवादी त्या शाळेत राहत होते आणि तेथे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) तयार करत असताना हा स्फोट झाला असावा. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा