31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
घरदेश दुनिया'या' देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला

‘या’ देशात झाला मोठा दहशतवादी हल्ला

Google News Follow

Related

पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशाच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झालाय. यात जवळपास १५ सैनिकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण बेपत्ता झालेत. हा हल्ला सैन्याच्या सप्लाय मिशनवर झाला. या हल्ल्यात ७ पेक्षा अधिक जवान जखमी झालेत. नायजरच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी (२ जुलै) या हल्ल्यानंतर ६ जवान गायब असल्याची माहिती दिलीय. हा हल्ला तिलाबेरी क्षेत्रातील तोरोदी भागात झाला.

सशस्त्र दहशतवाद्यांनी दबा धरुन सैन्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांचा जखमी साथीदाराला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चकमकीत तो स्फोटकांवर पडून स्फोट झाला. या हल्ल्यात १५ जवानांचा मृत्यू झालाय, तर ७ जण जखमी झालेत.

नायजरच्या सैन्याने या हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करत संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केलीय. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विमानातूनही सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेय. आफ्रिकेच्या या भागात जिहादी संघटना आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) आणि अल कायदाचा प्रभाव आहे. हे हल्लेखोर माली आणि बुरकीना फासोच्या सीमावर्ती भागातही हल्ले करत राहतात.

नायजरमध्ये कट्टरतावादी संघटनांची चांगलीच दहशत आहे. येथे कायमच सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहतात. मागील मार्च महिन्यात दहशतवाद्यांनी थेट राष्ट्रपती भवनाबाहेरच ३० मिनिटांपर्यंत गोळीबार केला. विशेष म्हणजे मोहम्मद बाजूम राष्ट्रपती पदाची शपथ घेणार होते त्याच्या दोन दिवस आधीच ही घटना घडली.

हे ही वाचा:

बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल

आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…

पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?

या आधी एक आठवडाभर दहशतवाद्यांनी सर्वसामान्य लोकांवर बेछूट गोळीबार केला होता. मोटारसायकलवर आलेल्या दहशतवाद्यांनी गावात घुसून लोकांना घराबाहेर काढलं आणि गोळ्या झाडत हत्या केल्या. या हल्ल्यात १३७ लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारीत अशाच हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा