31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणबसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच

Google News Follow

Related

पण दुकाने ८ पर्यंत खुली

मुंबईतील लोकल रेल्वे लवकर सुरू करण्यात यावी, यासाठी सातत्याने मागणी केली जात असली तरी येत्या काळात लोकल रेल्वे सुरू होण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी जाहीर झालेल्या निर्बंधांतील ताज्या बदलांत लोकल रेल्वेचा उल्लेख नसल्यामुळे रेल्वे सुरू करण्याबाबत ठाकरे सरकार अजूनही उदासिन असल्याचे दिसते.

सध्या मुंबईत लोकल रेल्वेच्या अभावी बसेसना तोबा गर्दी पाहायला मिळते आहे. बसस्टॉपवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसतात, नोकरीच्या निमित्ताने दूरवर जाऊ इच्छिणाऱ्यांना रेल्वे नसल्यामुळे बसशिवाय पर्याय नाही. त्याचा फटका त्यांना बसतो आहे. दुचाकीस्वार आणि रिक्षा-टॅक्सी याचा वापर प्रवाशांना करावा लागतो आहे.

व्यापाऱ्यांनी दुकाने खुली ठेवण्याची परवानगी मागितली होती, पण रविवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही. मात्र शनिवारी दुपारी ३ पर्यंत दुकाने उघडता येतील. इतर दिवशी ८ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी असेल. जीवनावश्यक आणि जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने ८ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

आता तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे ठाकरे सरकारने कोविडचा प्रादुर्भाव असलेल्या ११ जिल्ह्यांत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहे. अशा रितीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे . आज सार्वजनिक आरोग्य विभागाने आदेश जारी केले आहेत.

निर्बंधात झालेले बदल खालीलप्रमाणे

ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवणार आहेत.

जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तुंची विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहणार आहेत.

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांना वातानुकूलनाची मनाई. ती सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील.

सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.

सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.

शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा