पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रशियन तेल खरेदी थांबवेल असे आश्वासन दिल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने गुरुवारी पूर्णपणे फेटाळून लावला. शिवाय आपली भूमिका स्पष्ट करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, काल दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही फोन कॉल झालेला नाही.
गुरुवारी एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी ट्रम्पच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी आधीच एक निवेदन जारी केले आहे. पुढे म्हटले आहे की, “दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही फोन कॉल झालेला नाही.” यामुळे ट्रम्प यांचा दावा भारताने सपशेल फेटाळून लावला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. त्यामुळे युक्रेनमधील युद्धावरून मॉस्कोला एकाकी पाडण्याच्या त्यांच्या प्रयत्नातील हे मोठे पाऊल आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की त्यांनी पंतप्रधान मोदींकडे भारताकडून सुरू असलेल्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीबद्दल चिंता व्यक्त केली होती, यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाला निधी देण्यास मदत केली असे वॉशिंग्टनचे मत होते. भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारत मोठ्या प्रमाणात गॅस आणि तेल आयात करतो. अस्थिर बाजारपेठेत भारतीय ग्राहकांच्या हिताची सेवा करणे हे आमचे प्राधान्य नेहमीच राहिले आहे. आमचे आयात धोरण पूर्णपणे या उद्देशावर आधारित आहे. आम्ही इतर कोणत्याही घटकांच्या प्रभावाखाली निर्णय घेत नाही.
हेही वाचा..
छत्तीसगडच्या उत्तर बस्तरमधील अबुझमाड डोंगराळ वनक्षेत्र नक्षलमुक्त!
ऑपरेशन सिंदूर आमच्या आत्मनिर्भरतेचा जिवंत पुरावा
किती टक्के भारतीय गाडी खरेदी करणार ?
एअर इंडियाच्या विमान AI171 अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही बाजार परिस्थितीनुसार वेगवेगळ्या देशांशी व्यवहार करतो. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याकडून खरेदी देखील केली आहे. गेल्या दशकात हे प्रमाण झपाट्याने वाढले. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा संबंध वाढविण्यालाही प्राधान्य दिले आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे.







