एअर इंडियाच्या विमान AI171 अपघाताच्या सुरू असलेल्या चौकशीत विश्वसनीयता आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगून दिवंगत कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४१ प्रवाशांसह २६० जणांचा मृत्यू झालेल्या या अपघाताची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुष्कराज सभरवाल आणि फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) यांनी १० ऑक्टोबर रोजी संयुक्तपणे दाखल केलेल्या रिट याचिकेत AI171 क्रॅशची चौकशी करण्यासाठी कोर्ट मॉनिटरेड कमिटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) द्वारे केलेल्या सर्व पूर्वीच्या तपासांना बंद मानले जावे आणि सर्व भौतिक पुरावे न्यायालयीन देखरेखीखाली असलेल्या समितीकडे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील चौकशी न्यायालयाकडे हस्तांतरित केले जावेत, ज्यामध्ये स्वतंत्र विमान वाहतूक आणि तांत्रिक तज्ञ सदस्य असतील.
याचिकेनुसार, पहिल्या याचिकेत “१२.०६.२०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताची निष्पक्ष, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विमान वाहतूक आणि तांत्रिक तज्ञांसह एक न्यायिक देखरेख समिती किंवा चौकशी न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या याचिकेत अशी विनंती केली आहे की, पूर्वीच्या तपासण्या या बंद मानल्या पाहिजेत आणि सर्व संबंधित साहित्य, डेटा आणि रेकॉर्ड न्यायिक देखरेख समिती किंवा चौकशी न्यायालयाकडे हस्तांतरित केले पाहिजेत. याचिकेत असे म्हटले आहे की याचिकाकर्ते दुर्घटनेच्या तपासात विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे त्रस्त आहेत.
हे ही वाचा..
“भारताचे मॉस्कोसोबतचे ऊर्जा सहकार्य हे…” ट्रम्प यांच्या दाव्यावर रशियाने काय म्हटले?
भारतीय ग्राहकांचे हित सर्वोच्च! ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने दिले उत्तर
क्रिप्टो फसवणूक प्रकरणात हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलाविरुद्ध शोध वॉरंट
आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल
कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी यापूर्वी नागरी विमान वाहतूक सचिव आणि AAIB च्या महासंचालकांना पत्र लिहून विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, २०१७ च्या नियम १२ अंतर्गत औपचारिक चौकशीची मागणी केली होती.







