27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरदेश दुनियामहाराष्ट्राच्या 'त्या' सुपुत्राने केला लेह ते मनाली पायी प्रवास

महाराष्ट्राच्या ‘त्या’ सुपुत्राने केला लेह ते मनाली पायी प्रवास

Related

उंच पर्वतीय मार्ग आणि आव्हानात्मक भूप्रदेशांसाठी प्रसिद्ध असलेला, ४३० किमी लांबीचा लेह-मनाली महामार्ग हे जगभरातील साहसी उत्साही लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचे स्थान आहे. अनेक पर्यटक लेह- मनाली, लडाख मार्गावर बाईक राइड करण्यासाठी आवर्जून जातात. पण महाराष्ट्राच्या एका पर्यटकाने लेह ते मनाली असा चक्क पायी प्रवास केला आहे.

महाराष्ट्र्राचे डॉ. महेंद्र महाजन यांनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘लेह ते मनाली’ असा पायी प्रवास पूर्ण केला आहे. त्यांनी हा प्रवास केवळ ४ दिवस २१ तास १८ मिनिट एवढ्या कमी कालावधीत पूर्ण केला आहे. एवढ्या कमी कालावधीत त्यांनी हा प्रवास पूर्ण केल्याने त्यांच्या या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. लेह ते मनाली हा ४३० किमीचा प्रवास त्यांनी ७ जुलै रोजी सुरु केला होता जो १२ जुलै रोजी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पूर्ण झाला.

‘हम फिट तो देश फिट’ या घोषणेसह लेह शहरातून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्याच दिवशी ९१ किमीचे अंतर पार करून तांगलांग पास येथे पहिली ४ तासाची विश्रांती घेतली. डॉ. महाजन यांनी लेह ते मनाली या प्रवासादरम्यान ४ लाख ७५ हजार ७२० पावले इतका प्रवास केला आहे. या प्रवासाला एकूण ८ दिवसांचा वेळ असताना अगदी जलद गतीने प्रवास पूर्ण करण्याचे ध्येय डॉ.महाजन यांचे होते. त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले आणि त्यांच्या प्रवासाची वर्ल्ड गिनीज बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

या प्रवासात त्यांच्या सोबत त्यांचा पुतण्या ओम महाजन आणि सायकलस्वार सुमित पारिंगे व नितीन वानखेडे होते. लेह-मनाली येथील तांगलांग हे सर्वोच्च ठिकाण आहे. त्या नंतर दुसऱ्या दिवशी पाऊस, विजांच्या कडकडाटांसह थंड वाऱ्यांचाही सामना करावा लागला. ह्या प्रवासा दरम्यान त्यांना निसर्गाच्या विविध रूपांची दर्शन झाले, अशी माहिती डॉ. महेंद्र महाजन यांनी दिली आहे. डॉ. महाजन यांनी याआधी काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास १० दिवस ९ तास ५९ मिनिटांमध्ये पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान उंचावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा