अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ओंटारियो येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जशनप्रीत सिंग नावाच्या २१ वर्षीय भारतीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी जशनप्रीत सिंग हा २०२२ मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे.
२१ वर्षीय जशनप्रीत सिंगचा अपघात I15Freeway च्या जंक्शनच्या पूर्वेस झाला. एका मालवाहू ट्रॅक्टर-ट्रेलरने संथ गतीने सुरू असलेल्या वाहतुकीत दरम्यान एका SUV ला मागून धडक दिली. तसेच वाहनाला ब्रेक न लावता त्याच लेनमधील अनेक इतर वाहनांना धडक दिली. अपघात डॅशकॅम फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सिंगने अपघातापूर्वी ब्रेक वापरला नाही आणि अपघाताच्या वेळी तो ड्रग्जच्या नशेत होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता अधिकाऱ्यांनी तो ड्रग्जच्या नशेत गाडी चालवत असल्याचे सांगितले. यानंतर जशनप्रीत सिंगला ड्रग्जच्या नशेत गाडी चालवणे आणि वाहनाने मनुष्यवध करणे यासारख्या आरोपांखाली अटक करण्यात आली.
अपघातात आठ वाहनांचा समावेश होता. ज्यामध्ये चार व्यावसायिक ट्रकचा देखील समावेश होता. यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंग हा सध्या जामिनाविना सॅन बर्नार्डिनो काउंटीमध्ये कोठडीत आहे आणि त्याची पुढील न्यायालयात हजर राहण्याची तारीख गुरुवारी रँचो कुकामोंगा येथील रँचो सुपीरियर कोर्टात आहे.
हे ही वाचा :
स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक बिघाड
रोहित शर्माने मोडला सौरव गांगुलीचा विक्रम!
अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या टीडीपी नेत्याची तलावात उडी; मृत्यू
अमेरिकेचे ‘हे’ पाऊल म्हणजे युद्धाचे कृत्य! रशियाने असे का म्हटले?
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) पुष्टी केली की, सिंग याला देशात कायदेशीर इमिग्रेशन दर्जा नाही. अटकेनंतर आता यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन डिटेनर दाखल केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही. जशनप्रीत सिंगने २०२२ मध्ये दक्षिण अमेरिकेची सीमा ओलांडली आणि त्याच वर्षी मार्चमध्ये कॅलिफोर्नियाच्या एल सेंट्रो सेक्टरमध्ये बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी त्याला पहिल्यांदा रोखले. तथापि, नंतर जो बायडेन प्रशासनाच्या काळात त्याला देशाच्या अंतर्गत भागात सोडण्यात आले.







